Tarun Bharat

बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी केली आत्महत्या

ऑनलाईन टीम / धर्मशाळा :


बॉलिवूड अभिनेता आणि रंगभूमी कलाकार आसिफ बसरा यांनी आत्महत्या केली आहे. गुरुवारी कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा मधील मॅक्डोलगंजच्या जोगिबाडा रोडवर असणाऱ्या एका कॅफेजवळ त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या  आत्महत्येचे ठोस कारण अद्याप समजले नाही. मात्र,  कांगडाचे एसपी विमुक्त रंजन यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. वयाच्या 53 व्या वर्षी अशाप्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. आसिफ बसरा गेल्या 5 वर्षांपासून मॅक्डोलगंज मध्ये भाड्याच्या घरात राहत होते, त्यांच्याबरोबर त्यांची एक विदेशी मैत्रिण देखील राहत असे.


आसिफ बसरा एका विदेशी महिलेबरोबर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. गुरुवारी दुपारी ते त्यांच्या कुत्र्याला फिरवून आणण्यासाठी बाहेर गेले होते. घरी आल्यानंतर कुत्र्याच्या दोरीलाच त्यांनी गळफास घेतला. प्राथमिक माहितीनुसार, काही काळापासून ते नैराश्याचा सामना करत होते. कांगडाचे एसपी विमुक्त रंजन यांनी या प्रकरणाची पुष्टी केली असून पोलीसया प्रकरणाचे सखोल चौकशी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


आसिफ बसरा यांनी परजानियां, ब्लॅक ‘फ्रायडे’ याबरोबच त्यांनी अमेरिकन कॉमेडी सिनेमा आउटसोर्स, हिमाचली सिनेमा सांझ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ आदि चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या.

Related Stories

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नव्या योजनेला मंजूरी; 7 लाख रोजगार शक्य

datta jadhav

भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई; देवेंद्र फडणवीस आक्रमक

Archana Banage

हॉंगकॉंगकडून एअर इंडियाच्या विमानांवर पुन्हा बंदी

datta jadhav

”पंतप्रधान मोदींसह त्यांच्या साथीदारांनी हजारो किलोमीटर भूप्रदेश चीनला दिला”

Archana Banage

मातोश्री परिसरातील चहावाल्याची कोरोनावर मात

prashant_c

दादर : गर्दी होत असल्याने भाजीपाला मार्केट बंद 

prashant_c