Tarun Bharat

बॉलीवुड अभिनेत्री पायल रोहतगीला अटक; कारण …

ऑनलाईन टीम / मुंबई : 


सतत वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारी अभिनेत्री पायल रोहतगी हिला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सोसायटीच्या चेअरमनला सोशल मीडियावर शिवीगाळ केल्यामुळे आणि सोसायटीच्या लोकांशी सतत वाद घालणे व चेअरमनला जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 


चेअरमनने पायल रोहतगी विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनी आरोप लावला होता की, सोसायटीची सदस्य नसताना देखील पायल 20 जून रोजी झालेल्या सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत सहभागी झाली. त्यानंतर सोसायटीच्या सदस्यांनी सभेत सहभागी होण्यास नकार दिल्याने तिने शिवीगाळ केली. यासोबतच सोसायटीमधील मुलांच्या खेळण्यावरूनही तिने रहिवाशांसोबत भांडणे केली होती. या प्रकरणी सेटेलाईट पोलिसांनी तिला अटक केली आहे. 

  • यापूर्वीही झाली आहे अटक 


पायल रोहतगीला अटक करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. यापूर्वी राजस्थान मधील बुंदी पोलिसांनी तिला मोतीलाल नेहरू, माजी पंतप्रधान जवाहर लाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणीचा व्हिडिओ शेअर केल्यामुळे अटक करण्यात आली होती. युथ काँग्रेस नेते चर्मेश शर्मा यांनी तक्रार केली होती. यानंतर तिला राजस्थान न्यायालयाने जामीन दिला होता. 

Related Stories

‘गर्मी’ वेबसीरिजमध्ये अनुष्का कौशिक

Patil_p

रणबीर कपूरनंतर संजय लीला भन्साळी यांना देखील कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

होळीला ‘बच्चन पांडे’चा हंगामा

Patil_p

वेब सीरिजमध्ये दिसणार कृतिका कामरा

Patil_p

लिंडसे लोहानची प्रियकरासोबत एंगेजमेंट

Amit Kulkarni

‘भोला’मध्ये पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत तब्बू

Patil_p