Tarun Bharat

बोगस कागदपत्रे तयार करून दुकान गाळा लाटल्याचा आरोप

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

आपल्या आजीचे नाव कमी करून त्या ठिकाणी बोगस कागदपत्र तयार करून बापट गल्ली येथील दुकान गाळा स्वतःच्या नावावर करून घेतले आहे. बोगस कागदपत्रे तयार करून नाव दाखल करणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी विजय मारुती बोजगार यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमच्या आजोबांनी भाडय़ाने दुकान गाळा दिला होता. असे असताना त्या दुकान गाळय़ाची बोगस कागदपत्रे तयार करून तो लाटण्याचा प्रकार घडल्याचा आरोप सदर व्यक्तीने केला आहे. कमला रमेश बोजगार असे नाव दाखल होते. मात्र ते नाव कमी करण्यात आले आहे. याचबरोबर त्या दुकान गाळय़ावर कर्ज देखील काढण्यात आले आहे. तेंव्हा या प्रकरणाची चौकशी करून मला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना विजय बोजगार यांनी निवेदन दिले. यावेळी काही नागरिक उपस्थित होते.

Related Stories

कंग्राळी बुद्रुकमधील शर्यतीत जाफरवाडीची बैलगाडी प्रथम

Amit Kulkarni

गोल्डन व्हॉईसच्या अंतिम फेरीमध्ये रंगणार सुरांची मैफल

Amit Kulkarni

शासनाच्या प्रयत्नांना नागरिकांच्या पाठबळाची गरज

Omkar B

हाणामारीत जखमी युवकाचा मृत्यू

Patil_p

राष्ट्रीय पक्षातील मराठी भाषिकांसह 11 जणांना नारळ

Amit Kulkarni

बुधवारी प्रकाश हुक्केरींसह तिघांचे अर्ज दाखल

Amit Kulkarni
error: Content is protected !!