Tarun Bharat

बोगस महिला डॉक्टरचा पर्दाफाश; कोरोना रुग्णांवर करत होती उपचार

उंडाळे :  राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आता बोगस डाॅक्टरांचाही सुळसुळाट झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील नारायणवाडी काले येथे एका बोगस महिला डाॅक्टरला आज पोलिसांनी कोरोना रुग्णांवर उपचार करताना रंगेहाथ अटक केेली. 

कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे एक महिला डाॅक्टर पंत क्लिनिक नावाने एक दवाखाना चालवत होती. काले विभागात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोरोना मृत्यूदरही वाढत आहे. यापैकी अनेक रुग्णांनी पंत क्लिनिक येथे उपचार घेतल्याची माहिती काले प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यादव यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी सदर क्लिनिकला भेट दिली. मात्र, अनेकदा हे क्लिनिक बंद असल्याने यादव यांना शंका आली. त्यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून बोगस महिला डॉक्टरला अटक केली. 

Related Stories

अचानक लागलेल्या आगीत सुमारे दीडशे एकर ऊस जळून खाक

Archana Banage

वाठार बुद्रुक खुनातील आरोपीकडून 2 पिस्तुल जप्त

datta jadhav

वारसदारांच्या नोकरीचा मार्ग झाला मोकळा

Patil_p

रेठरे बु.येथील मृत्यू लसीकरणाने नसुन अन्य विकाराने

Patil_p

सातारा : भोगाव येथून 40 हजारांच्या तारेची चोरी

Archana Banage

मारहाण करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Patil_p