Tarun Bharat

बोपण्णा-शेपोव्हॅलोव्ह पहिल्याच फेरीत पराभूत

Advertisements

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील वेस्टर्न आणि सदर्न खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डेनिस शेपोव्हॅलोव्ह यांचे दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. सर्बियाचा टॉप सीडेड जोकोव्हिचने या स्पर्धेत पुरूष एकेरीतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे.

पुरूष दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात ग्रेनोलर्स आणि झेबालोस या जोडीने बोपण्णा आणि शेपोव्हॅलोव्ह यांचा 6-4, 7-6 (7-1) असा पराभव करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. गेल्यावर्षी अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत ग्रेनोलर्स आणि झेबालोस या जोडीने पुरूष दुहेरीत अपविजेतेपद मिळविले होते. भारताचा रोहन बोपण्णा तब्बल पाच महिन्यानंतर टेनिस कोर्टवर पुनरागमन केले आहे.

सर्बियाचा टॉप सीडेड टेनिसपटू जोकोव्हिच याला मानेमध्ये वेदना जाणू लागल्याने त्याने पुरूष एकेरीतून माघार घेतली आहे. जोकोव्हिचला या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुढेचाल मिळाली होती. 31 ऑगस्टपासून न्यूयॉर्कमध्ये अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे.

Related Stories

पोर्तुगालच्या विजयात रोनाल्डोची हॅट्ट्रिक

Patil_p

2022 आशियाई स्पर्धा शुभंकराचे अनावरण

Patil_p

पाकिस्तानी नागरिकांची आफ्रिदीला सणसणीत चपराक

Patil_p

भारत-ब्रिटन प्रो हॉकी लीग सामने लांबणीवर

Patil_p

प्लिस्कोव्हा, अँड्रेस्क्यू यांचे आव्हान समाप्त

Patil_p

जोकोविचची सलामीची लढत ड्रेपरशी

Amit Kulkarni
error: Content is protected !!