Tarun Bharat

बोबडय़ा मुलीच्या गाण्याने जिंकली मनं

Advertisements

अलिजेने गायले मामाने लिहिलेले गाणे

तीन वर्षीय मुलंमुली योग्यप्रकारे बोलू देखील शकत नाहीत. परंतु याच वयात कोटा येथील अलिजेने गाणे गात कोटय़वधी लोकांची मनं जिंकली आहेत. तिच्या पहिल्या गाण्यालाच इन्स्टावर 10 कोटींहून अधिक लोकांनी पाहिले आहे. अलिजेचे निरागस बोबडा आवाज लोकांना पसंत पडत आहे. बॉलिवूडच्या मोठय़ा स्टारनी देखील यावर रील तयार केले आहेत.

अलिजेचे मामा आदिल रिजवी यांचा कोटामध्ये स्टुडिओ आहे. मामा सलमान इलाहीने ‘मेला दिल पहाडों में खो गया है…’ गाणे लिहिले होते. आदिलने या गाण्याला स्वतःच्या स्टुडिओत अलिजेच्या आवाजात शूट करत रिकॉर्डिंग केले. 6 महिन्यांपूर्वी या गाण्याला त्यांनी स्वतःचे युटय़ूब चॅनेल एरिज म्युझिक अँड फिल्मवर अपलोड केले. तसेच त्यांनी अलिजेच्या इन्स्टा अकौंटवरही ते शेअर केले. त्यानंतर बोबडय़ा आवाजातील हे गाणे प्रचंड ट्रेंड झाल्याने इन्स्टावर ते 10 कोटींहून अधिक लोकांनी पाहिले आहे.  अलिजेचा बहुतांश वेळ रिकॉर्डिंग स्टुडिओतच जायचा, बोलण्यासोबत तिने गायनही सुरू केले होते असे आदिलने म्हटले आहे.

अलिजेचे गाणे ‘मेरा दिल पहाडों में खो गया है..’वर 5 लाखांहून अधिक लोकांनी रील तयार केले आहेत.  लोकप्रिय रॅपर हनी सिंह, कॉमेडियन भारती सिंह आणि हिना खानने अलिजेच्या गाण्यावर रील तयार करत ते स्वतःच्या अकौंटवर शेअर केले आहे. याचबरोबय युटय़ूबवरही 3 लाखांहून अधिक ह्यूज मिळाले आहेत.

अनेक ऑफर्स

अलिजेचे वडिल इरफान मोहम्मद हे बँकेत काम करतात तर आई अफरोज शिक्षिका आहे. एक वर्षापूर्वी तिने गायनाला सुरुवात केली होती आणि आता ती नर्सरीत शिकतेय. शिक्षणासोबत संगीत शिकणेही सुरू ठेवणार आहे. अलिजेची अन्य गाणीही लवकरच सादर होतील असे तिच्या पालकांनी सांगितले आहे. गाणे प्रसिद्ध झाल्यावर अनेक जाहिरात एजेन्सीजकडून तिला ऑफर मिळत आहेत.

Related Stories

वीज वितरण कंपन्यांना ‘अच्छे दिन’ शक्य

Patil_p

इंदोर पोलिसांची वेबसाइट हॅक

Patil_p

चंदीगडसंबंधी खासगी विधेयक मांडणार

Patil_p

नावात काय आहे?

Patil_p

केटीआर यांना तेलंगणाचे मुख्यमंत्रिपद?

Patil_p

सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारक्षेत्रात वाढ

Amit Kulkarni
error: Content is protected !!