Tarun Bharat

बोरजाईवाडीत बैलगाडी शर्यतींचा डाव कोरेगाव पोलिसांनी उधळला

प्रतिनिधी/ कोरेगाव

  बैलगाडी शर्यतींसाठी हॉटस्पॉट ठरलेल्या बोरजाईवाडीत मंगळवारी सकाळी कोरेगाव पोलिसांनी पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतींचा डाव उधळला. तब्बल 41 लाखांचा मुद्देमाल जप्त करत 12 जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन बैलांची रवानगी वेळे, ता. वाई येथील गोशाळेत करण्यात आली आहे. कोरेगाव पोलिसांनी अवघ्या आठवडाभरात दुसर्यांदा कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरजाईवाडीत डोंगर उतारावर मोकळ्या जागेत बैलगाडय़ांच्या शर्यंतींचे आयोजन केले जात होते. शर्यतीचे आयोजन करणारे संयोजक हे सर्वच माहिती गुप्त ठेवत, केवळ ठराविक जणांना मोबाईल अथवा तत्सम साधनांच्या आधारे संपर्क केला जात असल्याने पोलिसांपुढे बैलगाडी शर्यती बंद करणे मोठे आव्हान होते. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी शासन आणि न्यायालयाच्या निर्णयाचा कोणत्याही परिस्थितीत आदर करायचा, हाच दृष्टीकोन ठेवून स्वतंत्र नेटवर्क तयार केले होते.

मंगळवार दि. 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9.45 च्या सुमारास बैलगाडी शर्यती सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे, उपनिरीक्षक विशाल कदम, पोलीस नाईक धनंजय दळवी, जवान किशोर भोसले, प्रमोद जाधव, आण्णा चव्हाण यांना कारवाईसाठी पाचारण केले. पोलीस पथक बोरजाईवाडीत पोहचताच, शर्यतीचे आयोजन करणारे संयोजक, गाडीवान व शर्यत पाहण्यास आलेल्यांची पळापळ झाली. जो रस्ता दिसेल, तिकडे पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करुन सर्वांनाच ताब्यात घेतले. घटनास्थळावरुन पीक अप टेंम्पो क्र. एम. एच. 12. ए. डी. 1976, टाटा पीक अप टेंम्पो क्र. एम. एच. 11. सी. एच. 3230, मारुती सुझुकी स्वीफ्ट क्र. एम. एच. 14- 1213 यांच्यासह तीन बैल असा एकूण 40 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस नाईक धनंजय दळवी यांनी तक्रार दिली असून, त्यानुसार  अफसर युनुस पठाण, रा. डिस्कळ, बाबुराम कदम, रा. चंचळी, शिवाजी भागवत वावरे, रा. कुमठे, अभिजित प्रकाश जगदाळे, रा. कुमठे, वर्धमान विलास येवले, रा. शेंदुरजणे, चेतन देवीदास खंदारे, रा. कोंढवळे, जि. पुणे, योगश प्रकाश जगदाळे, रा. कुमठे, आशुतोष प्रवीण भोसले, रा. एकसळ, सुरज शिवाजी भेसले, रा. एकसळ, घनश्याम अनिल भोईटे, रा. कण्हेरखेड, अजय तानाजी यादव, रा. कण्हेरखेड, जागा मालक रणजित भोसले, रा. एकसळ याच्यासह 25 ते 30 व्यक्तींच्या विरुध्द कोरेगाव पोलीस ठाण्यात बैलगाडी शर्यती भरविणे, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणे, पैशाच्या स्वरुपात सट्टा लावून जुगार खेळणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे व सहाय्यक फौजदार विजय जाधव तपास करत आहेत. 

Related Stories

वायसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

datta jadhav

ग्रामसेवकाला मारहाण करणाऱयाला सहा महिन्यांची कैदेची शिक्षा

Patil_p

गगनगड रस्त्यावरील मोरीचे काम सुरू

Archana Banage

”उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं”

Archana Banage

महाराष्ट्रात मागील 24 तासात 137 मृत्यू; 5,609 नवे कोरोना रुग्ण 

Tousif Mujawar

नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर

Archana Banage