Tarun Bharat

बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द

Advertisements

ऑनलाईन टीम / लंडन : 

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 26 जानेवारीचा भारत दौरा रद्द केला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या परेडला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचे वाढते रुग्ण लक्षात घेता जॉन्सन यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. परिणामी त्यांनी भारत दौरा रद्द केला.

दरम्यान, भारतात प्रजासत्ताक दिनाला दरवर्षी विविध देशांचे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी भारताने जॉन्सन यांना निमंत्रित केले होते. मात्र, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे जॉन्सन यांनी हा दौरा रद्द केला.

Related Stories

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी घेतला समोश्याचा स्वाद

Patil_p

हंता विषाणूने वाढवली चिंता

datta jadhav

इराणकडून भारताला झटका; स्वतःच उभारणार चाबहार ते जाहेदानपर्यंतचा रेल्वे मार्ग

datta jadhav

रशियाने तयार केले कोरोनावर प्रभावी औषध

datta jadhav

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 1.18 लाखांवर

datta jadhav

जगभरातील दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक

Rohan_P
error: Content is protected !!