Tarun Bharat

बोरी स्वामी विवेकानंद महाविद्यालयातर्फे महिलादिनी कतृत्ववान महिलांचा सन्मान

प्रतिनिधी /फोंडा

बोरी येथील स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात आंतराष्ट्रीय महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सामाजिक जीवनात घरसंसार सांभाळून व्यवसायिक, शैक्षणिक व समाजकार्यात योगदान दिलेल्या  कतृत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहूण्य़ा म्हणून कुंकळी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. अपुर्वा मराठे, ग्रंथपाल सौ. सोनिया देसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुब्रमण्यम भट, स्टायल मंत्रास  बुटीकच्या मालक सौ. विंदा भट, टीना ड्रायव्हिंग स्कुलच्या मालक क्लेमॅटीना फर्नाडीस आणि आरोग्य सेवा कर्मचारी अश्लेषा नाईक आदी उपस्थित होत्या.

व्यवसाय, शैक्षणिक आणि समाजकार्यात वावरणाऱया या तीन क्षेत्रामधील कार्याबद्दल महिलांचा सत्कार करण्यात आला. त्य़ाना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.  प्राध्यामिका डॉ. अपुर्वा मराठे व अश्लेषा नाईक यांनी स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे सातत्याने दरवर्षी हा दिवस साजरा करीत असल्यामुळे कौतुकोद्गार काढले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुब्रमण्यम भट यांनी स्वागतपर भाषणात महिला सशक्तीकरण यावर आपले विचार मांडले. सुत्रसंचालन प्राध्यापिका प्रणिता कळंगुटकर यांनी केले. कृपाली खांडेपारकर यांनी आभार मानले.

Related Stories

कोसंबी विचारमहोत्सव 10 पासून

Amit Kulkarni

सांखळीवासीयांमुळेच राज्याचा विकास करण्याची संधी

Patil_p

गोमंतकीय पत्रकारांचा चाणक्य पुरस्काराने सन्मान

Amit Kulkarni

म्हापसा जिल्हा आझिलोत मुख्यमंत्र्यांची अचानक भेट

Amit Kulkarni

कब्रस्तानसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे

Amit Kulkarni

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाला वैयक्तिक संरक्षक उपकरणाचे वितरण

Amit Kulkarni