Tarun Bharat

बोलोली येथील अपघातात सातार्डेची महिला जागीच ठार

मोटारसायकल घसरून डंपरखाली पडल्याने झाला अपघात

सांगरूळ / वार्ताहर

बोलोली व आमशी (ता.करवीर) दरम्यान रस्त्यावरील वळणावर दुचाकी व डंपरच्या धडकेत डंपर खाली पडल्याने डंपरचे चाक डोक्यावरून जाऊन झालेल्या अपघातात सातार्डे (ता. पन्हाळा ) येथील आरती संभाजी नाळे ( वय २२ ) हिचा जागीच मृत्यू झाला. तेजस्विनी नाळे (वय १९ ) त्याच्या पायाला गंभीर इजा झाली असून तिच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुचाकी चालक सचिन संभाजी नाळे व अविशिल नाळे किरकोळ जखमी झाले आहेत.

प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सातार्डे ( ता . पन्हाळा ) येथील सचिन संभाजी नाळे पत्नी आरती व मुलगा अविशिल व पुतणी तेजस्विनी यांचेसह दुचाकीवरून रविवारी नातेवाईकांच्या लग्नाचा जथा काढणेसाठी कळे (ता . पन्हाळा ) येथे गेले होते . जथ्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास ते स्वयंभूवाडी येथे देवदर्शनासाठी गेले होते .देवदर्शन करून गावी परत जात असताना सुमारे सहाच्या सुमारास बोलोली व आमशी गावांच्या दरम्यान बादा नावाने ओळखल्या जाणाऱ्या ओढ्यानजीक रस्त्याला तीव्र उतार आहे या ठिकाणी रस्त्याच्या कडेला कारखान्यासाठी तोडलेल्या ऊसाची थप्पी मारलेली होती. सचिन नाळे यांची दुचाकी व बोलोलीकडे क्रॅशशँड घेऊन चाललेला डंपर या ठिकाणीच समोरासमोर आले . रस्त्याच्या बाजूला ऊसाची थप्पी असल्याने दोन्ही वाहने पास होण्यासाठी पुरेशी जागा नव्हती .दरम्यान रस्त्याला उतार असल्याने दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीचा हँडल डंपरला धडकल्याने दुचाकी घसरून खाली पडली. यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या आरती नाळे डंपर खाली पडल्या. डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला . दुचाकी चालक सचिन नाळे त्यांच्या मुलगा अविशिल किरकोळ जखमी झाले तर पुतणी तेजस्विनीच्या पायाला गंभीर इजा झाल्याने त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

करवीर पोलिसांनी घटना स्थळावर अपघाताचा पंचनामा केला. आरती नाळे यांचे मृतदेहाचे सीपीआरमध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा सातार्डे तालुका पन्हाळा येथे शोकाकुल वातावरणात आरती नाळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेने सातार्डेसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

Related Stories

‘इचलकरंजी’ नंतरही दूधगंगेत अर्धा टीएमसी पाणी

Archana Banage

Kolhapur : खासदार मानेंचा इतिहास विश्वासघाताचा…शेपूट वाकडी ती वाकडीच राहिली- सुषमा अंधारे यांचा घणाघात

Abhijeet Khandekar

कळंबा येथे निकाली कुस्त्यांचे मैदान

Archana Banage

मनपाची 31 मे रोजी आरक्षण सोडत

Kalyani Amanagi

मधमश्यांच्या हल्ल्यात मेंढोली येथील वृद्धाचा मृत्यू

Archana Banage

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रध्दांजली

Archana Banage