Tarun Bharat

ब्रह्मलिंग हायस्कूलतर्फे रामू गुगवाड यांचा सत्कार

Advertisements

उचगाव : सुळगा (हिं.) येथील शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित ब्रह्मलिंग हायस्कूलमधील कन्नड विषयाचे शिक्षक रामू गुगवाड यांची कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ बेंगळूर राज्य प्रमुख सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा संस्था व शाळेच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन देवाप्पा पाटील होते. समारंभाला संस्थेचे उपाध्यक्ष भाऊराव गडकरी, सेक्रेटरी बी. डी. पाटील, संचालक अशोक चंद्रू पाटील, कृष्णा पाटील, प्रकाश पाटील, यल्लाप्पा कलखांबकर, डी. एस. पट्टणशेट्टी, महादेव पाटील, पी. जी. काकतकर, एल. एस. मेणसे, मुख्याध्यापक आर. एन. हुलजी, गीतांजली हुलजी उपस्थित होते. पी. एम. मुतकेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्था व शाळा यांच्यावतीने रामू गुगवाड यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे शिक्षक संस्थेचे संचालक उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. ए. झेंडे यांनी केले. व्ही. सी. अनगोळकर यांनी आभार मानले.

Related Stories

हिंडलगा यात्राकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवा

Amit Kulkarni

पेट्रोल – डिझेलचे दर भडकले

Patil_p

शहराचा उत्तर भागासाठी अग्निशमन केंद्र गरजेचे

Amit Kulkarni

कंप्लीट कराटे अकादमीच्या विद्यार्थ्यांना बेल्ट प्रदान

Amit Kulkarni

अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांनाही हॅकर्सची भुरळ

Amit Kulkarni

शहरात भटक्मया कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण

Omkar B
error: Content is protected !!