Tarun Bharat

ब्रह्मास्त्र’नंतर रणवीर-आलियाचा विवाह?

Advertisements

अभिनेता रणवीर कपूर आणि आलिया भट्ट दीर्घकाळापासून स्वतःच्या अफेयरवून चर्चेत आहेत. त्यांच्या विवाहाबद्दल वारंवार बातम्या समोर येत असतात. रणवीर आणि आलिया लवकरच विवाह करणार असल्याचे आता सांगण्यात येत आहे.

रणवीर-आलिया यांच्या विवाहासाठी डिसेंबरचा महिना निश्चित झाल्याचे वृत्त आहे. विवाहाची तयारीही सुरू झाल्याचे समजते. दोघांचे कुटुंबीय एक उत्तम ठिकाण शोधत आहेत. लवकरच विवाहस्थळ निश्चित करण्यात येईल. रणवीर आणि आलिया यांनी स्वतःच्या विवाहाच्या तयारीकरता दीड महिन्यांचा बेक घेतला आहे.

दोघांनी अलिकडच्या काळात कुठलाच नवा चित्रपट स्वीकारलेला नाही रणवीर सध्या लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. तर आलिया ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. दोघेही नोव्हेंबरमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे चित्रिकरण संपविणार आहेत. विवाहापूर्वी त्यांचा हा शेवटचा चित्रपट ठरू शकतो. आलियाने विवाहासाठी कुठलाच नवा चित्रपट स्वीकारलेला नाही. तर रणवीरने ‘ऍनिमल’ चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षांपर्यंत टाळले आहे. 

Related Stories

बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार सरगुन मेहता

Patil_p

Porn Film Case : राज कुंद्रा 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत

Rohan_P

अर्धा नर अन् अर्धी मादी असलेला पक्षी

Amit Kulkarni

इनेस डी रॅमनला डेट करतोय ब्रॅड पिट

Patil_p

काश्मीर फाइल्स’ चित्रपटानंतर काश्मीरमध्ये सर्वाधिक हत्या- संजय राउत

Abhijeet Khandekar

पार्कर टेक्निक शिकणार सलमान

Patil_p
error: Content is protected !!