Tarun Bharat

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाएर बोल्सोनारो यांना कोरोनाची बाधा

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया : 

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाएर बोल्सोनारो यांना कोरोनाची बाधा झाली आहे. बोल्सोनारो यांना ताप आणि कोरोनाची इतर लक्षणे जाणवत होती. मात्र, त्यांनी हे फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. अखेर चौथ्या चाचणीवेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

बोल्सोनारो यांनी सुरुवातीपासूनच कोरोना विषाणूला गांभीर्याने घेण्याचे टाळले होते. देशात कोरोनाची गंभीर परिस्थिती असतानाही त्यांनी कोरोना हा साध्या फ्लूसारखा आहे, असे म्हणत राज्यांच्या गव्हर्नरला लॉकडाउन शिथील करण्याचे आदेश दिले होते. ब्राझीलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग किंवा लॉकडाऊन करण्यासही बोल्सोनारो यांचा विरोध होता. आपल्यासाठी देशाची अर्थव्यवस्था अधिक महत्त्वाची आहे, असे त्यांचे म्हणणे होते. 

त्यामुळे त्यांचा जनमानसात मुक्त वावर होता. ते विना मास्क फिरायचे. मागील काही दिवसांपासून त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत होती. सोमवारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

Related Stories

कॅनडात हिंसक संघर्षात 10 ठार, 18 जखमी

Patil_p

अफगाणिस्तानमध्ये तातडीने लक्ष घालून युद्धबंदी करावी, मलालाचं जागतिक महासत्तांना आवाहन

Archana Banage

सरकारच्या अहंकाराचं हरण या निवडणुकीत होईल-सुधीर मुनगंटीवार

Abhijeet Khandekar

कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडीचा छापा

Kalyani Amanagi

मुंबईकरांना दिलासा : सर्वसामान्यांसाठी 1 फेब्रुवारीपासून लोकल सुरू

Tousif Mujawar

अंबानींच्या घराबाहेरच्या घटनेचे नाट्यरुपांतर; सचिन वाझे यांना कुर्ता घालून लावले चालायला

Tousif Mujawar