Tarun Bharat

ब्राझीलचे शिक्षणमंत्री डिकोटेली यांचा राजीनामा

ऑनलाईन टीम / पॅराग्वे : 

शैक्षणिक पात्रतेवरून वादग्रस्त ठरलेले ब्राझीलचे शिक्षणमंत्री कार्लोस ऍलबर्टो डिकोटेली यांनी राजीनामा दिला आहे. 

डिकोटेली हे आर्थिक विषयांचे तज्ज्ञ आहेत. मात्र, त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेली शिक्षणसंदर्भातील माहिती खोटी असल्याचे आरोप त्यांच्यावर होत होते. ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी काही दिवसांपूर्वीच डिकोटेली यांची शिक्षणमंत्रीपदी नियुक्ती केली होती. 

बोल्सोनारो यांच्याविषयी सुरुवातीपासूनच लोकांमध्ये नाराजी होती. त्यातच त्यांनी नियुक्त केलेल्या शिक्षण मंत्र्यांच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात वारंवार शंका उपस्थित होऊ लागल्या. बोल्सोनारो यांच्या अडचणीत वाढ होत असल्याने डिकोटेली यांनी आपल्या शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 

Related Stories

महाराष्ट्रापाठोपाठ ‘या’ राज्यातही 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण लांबणीवर

Tousif Mujawar

युद्धाचा भडका

Amit Kulkarni

ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी , मुदतही वाढली

Archana Banage

महाराष्ट्र : ‘या’ तारखेपासून सुरू होणार पाचवी ते आठवीचे वर्ग

Tousif Mujawar

…तर गाठ माझ्याशी, संभाजीराजेंचा चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांना इशारा

datta jadhav

फ्रान्स : नाताळाची तयारी

Patil_p