Tarun Bharat

ब्राझीलच्या नेमारशी पुमाचा नवा करार

बार्सिलोना :

 ब्राझीलचा 28 वर्षीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू नेमार बरोबर आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात क्रीडा साहित्य उत्पादन करणाऱया ‘पुमा’ या उद्योग समुहाने नवा करार केला आहे.

पुमा उद्योग समुहाने नेम्मार बरोबर केलेल्या कराराची घोषणा आपल्या वेबसाईटवर केली असून ‘द किंग इज बॅक’ असा मथळा या बातमीला देण्यात आला आहे.

नेमार यापूर्वी 15 वर्षे नाइके उद्योग समुहाशी निगडीत होता. नाइके आणि पुमा हे उद्योग समुह आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंसाठी शुज उत्पादन करतात. पुमा उद्योग समुहाशी नवा करार झाल्याचे नेमारने आपल्या ट्टिरवर म्हटले आहे. नेमार हा पॅरिस सेंट जर्मन संघाचा प्रतिनिधी आहे.

यापूर्वी महान फुटबॉलपटू ब्राझीलचे पेले, पुएफ, मथायस, युसेबो आणि अर्जेंटिनाचा माराडोना यांच्या व्हिडिओजचे निरीक्षण करत स्वत:ची फुटबॉल कारकीर्द घडविण्याचा प्रयत्न केला. असे प्रतिपादन नेमारने केले आहे.  2017 साली नेम्मारने बार्सिलोना क्लब सोडून पॅरीस सेंट जर्मन संघात दाखल होण्याचा निर्णय घेतला.  

पॅरीस सेंट जर्मन संघात दाखल होण्यासाठी नेम्मारकरिता विश्व विक्रमी 222 डॉलर्सची रक्कम मोजावी लागली होती. नेम्मार दाखल झाल्यानंतर पॅरीस सेंट जर्मन (पीएसजी) फुटबॉल क्लबने पॅरीसमध्ये तीनवेळा लीग-वन फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले. तसेच नेम्मारच्या कामगिरीमुळे पीएसजीने गेल्या महिन्यात चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. नेम्मारने बार्सिलोनाचे प्रतिनिधीत्व करताना या क्लबला चॅम्पियन्स लीग, फिफा क्लब विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा तसेच दोनवेळा ला लीगा फुटबॉल स्पर्धा जिंकून दिली.

Related Stories

मेरी कॉम, सिंधू, मिराबाई, केशवन यांची निवड

Patil_p

इंडियन ग्रां प्रि ऍथलेटिक्स स्पर्धा आजपासून

Patil_p

चेन्नईविरुद्ध दिल्ली ठरले ‘सुपरकिंग्स’!

Patil_p

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील पाच ‘स्टार’ खेळाडूंना साईकडून बढती

Patil_p

स्विटोलिना, बर्टन्स यांची अमेरिकन टेनिस स्पर्धेतून माघार

Patil_p

रिषभ पंत, शार्दुलला 100 टक्के दंड, आमरे निलंबित

Patil_p