Tarun Bharat

ब्राझीलच्या रोनाल्डीन्होला कोरोनाची बाधा

वृत्तसंस्था/ रिओ डी जेनेरिओ

ब्राझीलचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू 40 वर्षीय रोनाल्डीन्होला कोरोनाची बाधा झाली असून तो सध्या एका हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये दाखल झाला आहे.

आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीत रोनाल्डीन्होने बार्सिलोना तसेच एसी मिलान फुटबॉल क्लबचे प्रतिनिधीत्व करताना आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे जेतेपद या क्लबला मिळवून दिले होते. रोनाल्डिन्होचा संपर्क कोरोना बाधित असलेल्या काही व्यक्तींशी आला होता. त्यामुळे त्याची कोरोना चांचणी घेण्यात आली आणि तो पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रोनाल्डिहोने काही कालावधीसाठी आपण आयसोलेशनमध्ये दाखल होत असल्याचे सांगितले आहे.

Related Stories

कोरोनामुळे डब्लीन मॅरेथॉन रद्द

Patil_p

साबरीकडे पहिले डब्ल्यूबीसी जेतेपद

Patil_p

पीव्ही सिंधूने पटकावलं महिला एकेरीचे विजेतेपद

datta jadhav

डोडिग-पोलसेक पुरुष दुहेरीत विजेते

Patil_p

अफगाणसमोर बहरातील पाकिस्तानचे आव्हान

Amit Kulkarni

थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p
error: Content is protected !!