Tarun Bharat

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर

Advertisements

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया : 

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 29 लाख 67 हजार 064 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 99 हजार 702 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

शुक्रवारी ब्राझीलमध्ये 49 हजार 502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 1058 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण 29.67 लाख कोरोनाबाधितांपैकी 20 लाख 68 हजार 394 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 7 लाख 98 हजार 968 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेत आतापर्यंत 50 लाख 95 हजार 524 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 64 हजार 094 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

एलन मस्कने जिंकली मनं

Patil_p

चिनी राजदूताचा नेपाळच्या राजकारणात हस्तक्षेप

Patil_p

इंग्लंडमध्ये कॅन्सरसंबंधीची रक्त चाचणी मोहीम सोमवारपासून

Patil_p

पाकिस्तानला नोव्हेंबरमध्ये मिळणार नवा सैन्यप्रमुख

Patil_p

अमेरिकेत भारतीय इंजिनिअरची गोळ्या झाडून हत्या

datta jadhav

तालिबान अन् अफगाण सरकारमधील संघर्ष पेटला

Amit Kulkarni
error: Content is protected !!