Tarun Bharat

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखांपार

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया : 

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने 20 लाखांचा आकडा ओलांडला आहे. गुरुवारी ब्राझीलमध्ये 43 हजार 829 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 1299 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 20 लाख 14 हजार 738 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 76 हजार 822 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

20.14 लाख कोरोनाबाधितांपैकी 13 लाख 66 हजार 775 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 5 लाख 71 हजार 141 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेत आतापर्यंत 36 लाख 95 हजार 581 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 41 हजार 125 जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

युद्धाचा भडका

Amit Kulkarni

मागील 24 तासात देशात 43,509 नवे कोरोना रुग्ण; 640 मृत्यू

Tousif Mujawar

धक्कादायक! वृध्द महिलेस बँक म्हणाली.. तुमचा तर मृत्यू झालाय, पैसे कसे देऊ?

prashant_c

विदेशी कर्ज ओझ्यामुळे इम्रान खान अडचणीत

Patil_p

इंडोनेशियात महापूर; भूस्खलनात 50 जणांचा मृत्यू

datta jadhav

चीनची ब्रिटनमध्ये ‘भाषिक’ घुसखोरी

Patil_p