Tarun Bharat

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांनी गाठला 35 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया : 

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांनी 35 लाखाचा टप्पा गाठला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 35 लाख 05 हजार 097 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख  12 हजार 423 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

गुरुवारी ब्राझीलमध्ये 44 हजार 684 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 1234 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 35 लाख कोरोनाबाधितांपैकी 26 लाख 53 हजार 407 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 7 लाख 39 हजार 237 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 37 लाख 48 हजार 152 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेत आतापर्यंत 57 लाख 46 हजार 534 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 77 हजार 426 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

महामारीमुळे 1 अब्ज लोक दारिद्रय़ाच्या वाटेवर

Patil_p

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 12 लाखांवर

datta jadhav

पेरूमध्ये बाधितांची संख्या 12.83 लाखांवर

datta jadhav

कर्नाटकात १६ हजार पेक्षा कमी सक्रिय रुग्ण

Archana Banage

मिकी माउसच्या जगात राहण्याची संधी

Patil_p

संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ९ नोव्हेंबरला सुनावणी

Archana Banage