Tarun Bharat

ब्राझीलमध्ये 60 लाख रुग्णांची कोरोनावर मात

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया : 

ब्राझीलमध्ये 69 लाख 29 हजार 409 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 60 लाख 16 हजार 085 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

या देशात सोमवारी 27 हजार 419 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 526 जणांचा मृत्यू झाला. सध्या 7 लाख 31 हजार 379 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8 हजार 318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 1 लाख 81 हजार 945 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा जगात तिसरा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 2 कोटी 57 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.  

Related Stories

जगभरात 61.72 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

फिल्मी नव्हे, हे सत्य आहे

Patil_p

मुलासाठी जंगजंग पछाडणारा पिता

Amit Kulkarni

युरोपमध्ये महागाईमुळे घटस्फोटांवर बेक

Amit Kulkarni

केवळ मास्कद्वारे तयार केला वेडिंग ड्रेस

Patil_p

बांगलादेशने निभावली मैत्री, श्रीलंकेकडून निराशा

Amit Kulkarni