Tarun Bharat

ब्राझीलमध्ये 8.5 लाखाहून अधिक कोरोनाबाधित

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया : 

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांनी 8.5 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी ब्राझीलमध्ये 20 हजार 894 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 890 रुग्णांचा मृत्यू झाला. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 8 लाख 50 हजार 796 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 42 हजार 791 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

8.5 लाख कोरोनाबाधितांपैकी 4 लाख 27 हजार 610 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 3 लाख 80 हजार 395 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. 

दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेनंतर कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा क्रमांक लागतो. अमेरिकेत आतापर्यंत 21 लाख 42 हजार 224 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 1 लाख 17 हजार 527 जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

लॉकडाऊनमधून उद्योगांना सवलत कितपत फायद्याची ?

Patil_p

अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान, पंचनामे करण्याची स्वाभिमानीची मागणी

Archana Banage

इंडोनेशियात रात्री चमकणारे गूढ सरोवर

Patil_p

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार जाहीर

Archana Banage

बोलिवियाच्या राष्ट्राध्यक्षा जिनिन अंज यांना कोरोनाची बाधा

datta jadhav

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील तिसरी ते आठवीच्या परीक्षा रद्द

Tousif Mujawar