Tarun Bharat

ब्राझील, कोलंबिया संघांचे विजय

वृत्तसंस्था/ साओ पावलो

2022 साली कतारमध्ये होणाऱया फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी सुरू असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेतील दक्षिण अमेरिकन संघामधील लढतीत बलाढय़ ब्राझील आणि कोलंबिया यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी सलामी दिली.

पात्र फेरीचे सामने बंदीस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकविना खेळविले गेले. साओ पावलो येथे शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात ब्राझीलने बोलिव्हियाचा 5-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यावेळी पावसाचा वारंवार अडथळा ाला होता तर बॅरेनक्विला येथे झालेल्या दुसऱया एका सामन्यात व्हेनेझुएलाचा 3-0 असा पराभव केला. या पात्र फेरीच्या स्पर्धेत पहिल्या फेरीअखेर ब्राझील, कोलंबिया, उरूग्वे, अर्जेंटिना यांनी प्रत्येकी तीन तीन गुण मिळविले आहेत. पेरू आणि पराग्वे यांनी प्रत्येकी एक गुण घेतला आहे. इक्वेडोर, चिली, व्हेनेझुएला आणि बोलिव्हिया यांना आपले खाते उघडता आलेले नाही. आता या स्पर्धेतील दुसऱया फेरीतील सर्व पाच सामने येत्या मंगळवारी खेळविले जाणार आहेत.

ब्राझील आणि बोलीव्हिया यांच्यातील सामन्यात 16 व्या मिनिटाला ब्राझीलचे खाते मार्क्युनोसने हेडरद्वारे उघडले. 30 व्या मिनिटाला फिर्मेनोने ब्राझीलचा दुसरा गोल केला. 49 व्या मिनिटाला फिर्मेनोने ब्राझीलचा तिसरा तर वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. ब्राझीलच्या संघात प्रथमच स्थान मिळविणाऱया रॉड्रिगोने 66 व्या मिनिटाला आपल्या संघाचा चौथा गोल केला. फिलीप कुटिन्होने 73 व्या मिनिटाला हेडरद्वारे ब्राझीलचा पाचवा गोल करून बोलिव्हियाचे आव्हान संपुष्टात आणले.

कोलंबिया आणि व्हेनेझुएला यांच्यातील सामन्यात कोलंबियाचे सर्व म्हणजे तीन गोल पूर्वार्धात नोंदविले गेले. 16 व्या मिनिटाला कोलंबियाचे खाते झेपाटाने उघडले. 26 व्या मिनिटाला जोहान मोजिकाने कोलंबियाचा दुसरा गोल नोंदविला. मध्यंतराच्या कालावधीत पहिल्या स्टॉपेज कालावधीत म्युरेलने कोलंबियाचा तिसरा आणि शेवटचा गोल नोंदविला. व्हेनेझुएलाला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही.

Related Stories

पावसामुळे भारत-न्यूझीलंड सराव सामना रद्द

Amit Kulkarni

टी-20 मालिकेत बांगलादेशची विजयी सलामी

Patil_p

पाचव्या कसोटीसाठी मोहम्मद शमी तंदुरुस्त

Patil_p

पी. कश्यप उपांत्यपूर्व फेरीत, सामिया फारुकी पराभूत

Amit Kulkarni

विंडीज कसोटी संघात सिलेस नवा चेहरा

Patil_p

भारताचे सहा मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत

Amit Kulkarni