ब्राझीलमध्ये दिवसभरात 41 हजार 906 रुग्ण आढळले आहेत. 11 सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच एका दिवसात सापडलेल्या रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे. दिवसभरात 819 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशात संसर्गाची दुसरी लाट सुरू झाल्याचे मानून उपाययोजना केल्या जात आहेत. सरकारचा मुख्य भर दाट लोकवस्तीच्या भागावर आहे. तेथेच सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. परंतु कठोर टाळेबंदीसारख्या उपायांचा वापर करण्यास सरकारने नकार दिला आहे.


previous post
next post