Tarun Bharat

ब्रिगेडियर नंदकिशोर जाधव यांना मेजर जनरलपदी पदोन्नती

सातारा / प्रतिनिधी :

जम्मू-काश्मिर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले ब्रिगेडियर नंदकिशोर साहेबराव जाधव यांची नुकतीच मेजर जनरलपदी पदोन्नती करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा जिल्हय़ाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. जाधव हे कोरेगाव तालुक्यातील आर्वी या गावचे सुपुत्र आहेत. सेवानिवृत्त मेजर स्व. साहेबराव शंकराव जाधव व सातारा येथील माजी सैनिकांच्या मुलींचे वसतीगृहाच्या माजी अधिक्षिका स्व. सुभद्रा जाधव यांचे ते सुपुत्र आहेत.

नंदकिशोर यांचे शिक्षण मिल्ट्री स्कूल बेळगाव येथे झाले. त्यानंतर 1984 साली एनडीएसाठी त्यांची निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंडियन मिल्ट्री ऍकॅडमी यशस्वीपणे पूर्ण केले. नाशिकच्या अल्ट्रीलरी सेंटरचे कमांडर म्हणून व लष्कराच्या मुख्यालयात ही त्यांनी सेवा बाजाविली आहे. ते पदोन्नतीपुर्वी शिलाँग येथे कार्यरत होते. जाधव कुटुंबीय हे देशप्रेमी असुन सध्या त्यांची तीसरी पिढी ही सैन्यात कार्यरत आहे. त्यांचे आजोबा दुसऱया महायुध्दात सहभागी होते. तसेच त्यांचे ज्येष्ठ बंधू राजकुमार हे अल्ट्रीलरीमध्ये कर्नल पदावरून गतवर्षी सेवानिवृत्त झाले आहेत. तर लहान बंधू गुरूदत्त हे अल्ट्रीलरीमध्ये ब्रिगेडीयरपदी कार्यरत आहेत.

Related Stories

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात वेश्या व्यवसाय

datta jadhav

स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकयांचे बिघडले आर्थिक गणीत

Patil_p

कराड विमानतळ निर्बंधांचा मुद्दा लोकसभेत

Patil_p

मुंबई-पुणेकरांचा प्रवास धोकादायक

Patil_p

पुसेसावळी दरोडय़ातील फरारी आरोपी जेरबंद

Patil_p

कराडकरांसाठी आनंदवार्ता : कोरोनाला हरविणाऱ्या 11 जणांना कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

Archana Banage