Tarun Bharat

ब्रिटनचे व्हिसाशुल्क वाढले, भारतीयांवर पडणार प्रभाव

Advertisements

वृत्तसंस्था / लंडन

ब्रिटनच्या दीर्घकालीन व्हिसा शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतीयांना आर्थिक फटका बसणार आहे. ब्रिटनचे भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनाक यांनी स्वतःच्या पहिल्या अर्थसंकल्पात भारतासह अन्य देशांमधून येणाऱया लोकांसाठी व्हिसा महाग करत अनिवार्य आरोग्य शुल्कात मोठी वृद्धी करण्याची घोषणा केली आहे.

सुनाक यांनी अनिवार्य आरोग्य शुल्क (आयएचएस) 400 पौंडवरून (सुमारे 38 हजार रुपये) वाढवत 624 पौंड (सुमारे 60 हजार रुपये) करण्याची घोषणा केली आहे. 39 वर्षीय सुनाक यांनी हाउस ऑफ कॉमन्समध्ये बुधवारी अर्थसंकल्प मांडला आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसचा (एनएचएस) लाभ विदेशी नागरिक घेऊ शकतात. पण या सेवेसाठी त्यांना शुल्क भरावे लागणार असल्याचे सुनाक यांनी म्हटले आहे.

विदेशी विद्यार्थ्यांसाठीही आयएचएस 300 पौंडवरून वाढवत 470 पौंड (सुमारे 45 हजार रुपये) करण्याची तयारी आहे.ब्रिटनमध्ये इमिग्रेशन हेल्थ सरचार्ज एप्रिल 2015 मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आला होता.

डिसेंबर 2018 मध्ये हे शुल्क 200 पौंडवरून वाढवत 400 पौंड करण्यात आले होते.

Related Stories

टांझानियामध्ये सरोवरात कोसळले विमान

Patil_p

कलियुगातील पिता

Patil_p

गुगलचे सीईओ पिचाई ‘पद्मभूषण’ने सन्मानित

Patil_p

पाक-बलुचिस्तानमध्ये लष्करी तळांवर हल्ला

Amit Kulkarni

सौदी अरेबियात 3 राजपुत्रांना अटक

tarunbharat

रशियाच्या हल्ल्यात 35 ठार, 100 जखमी

Patil_p
error: Content is protected !!