Tarun Bharat

ब्रिटनच्या यादीत पाच भारतीय महिलांचा समावेश

लंडन

 ब्रिटनमधील ऍटोमिक एनर्जी अथॉरिटीच्या चित्रा श्रीनिवासनसह मूळ भारतीय असणाऱया पाच महिलांनी वर्ष 2020 मध्ये ब्रिटनच्या मुख्य 50 महिला इंजिनियरांच्या यादीत स्थान पटकावले आहे. श्रीनिवासन, युकेएईएच्या फ्यूजन रिसर्च लॅबमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. याव्यतिरिक्त ट्रान्स्पोर्ट इंजिनियर रितू गर्ग, भू वैज्ञानिक इंजिनियर बरनाली घोष, जलवायू विशेष तज्ञ अनुषा शाह आणि वरिष्ठ इंजिनियर कुसुम त्रिखा यांचाही या यादीत समावेश आहे. महिला इंजिनियर दिवसाचे औचित्य साधत या नावांची घोषणा केली आहे. इंजिनियर जगतामध्ये तज्ञांनी सदरच्या 50 महिलांची साखळी केली आहे. यातून इंजिनियर जगातामधील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले आहे. याच्यासाठी प्रत्येक वर्षाला वुमेन इंजीनियरिंग सोसायटीकडून यांचे आयोजन केले जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

Related Stories

फ्लिपकार्टचे सीईओ अर्थमंत्र्यांना भेटले

Patil_p

रेल्वेची विशेष फे-यांमधून 20 कोटीची कमाई

Patil_p

फेब्रुवारीमध्ये इंधनाची मागणी उच्चांकावर

Patil_p

‘एचडीएफसी’कडून 2 लाख कोटी रुपयांच्या गृहकर्जास मंजुरी

Patil_p

एचसीएल टेकचा तिमाही नफा 22.8 टक्क्मयांनी वधारला

Patil_p

वर्ष 2021 च्या अंतिम दिवशी सेन्सेक्सची उसळी

Patil_p
error: Content is protected !!