Tarun Bharat

ब्रिटनने दिली फायझर-बायोटेकच्या लसीला मंजुरी

Advertisements

ऑनलाईन टीम / लंडन : 

ब्रिटनने फायझर-बायोटेकच्या कोरोनावरील लसीला मंजुरी दिली आहे. यामुळे पुढील आठवड्यात ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहे. 

फायझर-बायोटेकची ही लस कोरोनावर 95 टक्के प्रभावी आहे. ही लस व्यापक वापरासाठी योग्य असल्याचे ब्रिटिश नियामक MHRA ने म्हटले आहे. ज्या लोकांना सर्वाधिक गरज आहे, त्यांना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे. 

या लसीची आतापर्यंत 43,000 लोकांवर चाचणी करण्यात आली. त्यामध्ये लसीच्या सुरक्षेबाबत कोणतेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले नाही. त्यामुळे फायझर कंपनीने अमेरिकेमध्येही लसीला मंजुरी मिळविण्यासाठी अर्ज केला आहे.

ब्रिटनमध्ये आतापर्यंत 16.43 लाखांहून अधिक जण बाधित झाले आहेत. तर 59 हजार जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

Related Stories

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसाठी १०० कोटी

Abhijeet Khandekar

ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 2297 कोटींची मदत

Rohan_P

पर्यावरण रक्षणात भारतीय मुलीचे योगदान

Patil_p

लाल टोपीला घाबरल्याने उद्घाटनांचा धडका ; जया बच्चन यांचे भाजपवर टीकास्त्र

Sumit Tambekar

ब्राझीलमध्ये कोरोनाबळींची संख्या 1.50 लाखांवर

datta jadhav

तलाव ठेका रक्कम भरण्यास मे अखेरपर्यत मुदतवाढ

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!