Tarun Bharat

ब्रिटनने 90 वर्षीय आजींना दिली कोरोनावरील पहिली लस

ऑनलाईन टीम / लंडन : 

ब्रिटनमध्ये आज कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, फायझर-बायोएनटेकची ही पहिली लस एका 90 वर्षीय महिलेला देण्यात आली. 

ब्रिटनमधील कॉवेंट्रीमधील युनिव्हर्सिटीच्या हॉस्पिटलमध्ये मारग्रेट कीनान नावाच्या महिलेला पहिली लस देण्यात आली. ही महिला महिला उत्तर आयर्लंडची रहिवासी आहे. लस घेतल्यानंतर कीनान म्हणाल्या, ‘सर्वात आधी लस देण्यासाठी मला निवडलं हा मी माझा गौरव समजत आहे. मी जर 90 व्या वर्षी लस घेऊ शकते तर इतर लोक  घेऊ शकत नाहीत?, त्यांनीही न घाबरता लस टोचून घ्यावी’.

ब्रिटनने फायझर-बायोएनटेकच्या लसीच्याआपत्कालीन परिस्थितीत वापराला अस्थायी स्वरुपाची मंजूरी दिली आहे. या अंतर्गत आज लसीकरण सुरु झाले आहे. डॉक्टर, आरोग्य सेवक आणि 80 वर्षांवरील व्यक्तींना प्रथमतः ही लस देण्यात येणार आहे. ब्रिटननंतर बहरिननेही या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

Related Stories

भारताच्या पायाभूत सुविधांमुळे चीन बिथरला

Patil_p

पाकिस्तानचा आडमुठेपणा, सार्कची बैठक टळली

Patil_p

पाकिस्तानात अल्पसंख्याक शीख अन् हिंदूंवर अत्याचार

Patil_p

पाण्यात तरंगता पेरूचा बाजार

Patil_p

ओमिक्रॉनविरुद्ध उपयुक्त ठरते आहे स्पुतनिक व्ही लस

Patil_p

जर्मनीचे विरोधी पक्षनेते कीव्हच्या दौऱयावर

Patil_p