Tarun Bharat

ब्रिटनमधील युद्धसरावात भारत सहभागी होणार नाही

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने ब्रिटनमध्ये होणाऱ्या बहुदेशीय युद्ध सरावात (कोब्रा वॉरिअर 2022) सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हवाई दलाची विमाने या हवाई सरावात सहभागी होणार नाहीत. भारतीय हवाई दलाने शनिवारी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.

6 ते 27 मार्च दरम्यान ब्रिटनमधील वॅडिंग्टन येथे कोब्रा वॉरिअर 2022 हा युद्धसराव होणार आहे. हवाई दलाने आपली पाच लढाऊ विमाने या लष्करी सरावात पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर या युद्धसरावात सामिल न होण्याचा निर्णय भारतीय हवाई दलाने घेतला आहे.

Related Stories

“लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ३०० जागा जिंकू शकत नाही”

Archana Banage

एसआयटी स्थापन, खटला फास्ट ट्रकमध्ये

Patil_p

काश्मीरमध्ये जवानांचा दहशतवाद्यांशी संघर्ष

Patil_p

अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर

Patil_p

पुलवामा येथे कमी शक्तीचा स्फोट

Patil_p

विवाह सोहळय़ाशिवाय विवाह नोंदणी अमान्य

Amit Kulkarni