Tarun Bharat

ब्रिटनमधील लॉर्ड मेघनाद देसाई यांचा मजूर पक्षाला रामराम

वृत्तसंस्था/ लंडन

ब्रिटनमधील प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि विचारवंत लॉर्ड मेघनाद देसाई यांनी तेथील विरोधी पक्ष असणाऱया मजूर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मजूर पक्ष आपल्या तत्वज्ञानापासून भरकटला असून तो वंशवादी झाला असल्याने आपण त्याचा त्याग करीत आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

80 वर्षांचे मेघनाद देसाई या पक्षाचे गेली 49 वर्षे सदस्य होते. ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या समाजात त्यांनी हा पक्ष लोकप्रिय करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. मजूर पक्षाचे वादगस्त नेते जेरेमी कॉर्बिन यांना काही दिवसांपूर्वी पक्षातून निलंबित करण्यात आले होते. तथापि, त्यांना 19 दिवसांनंतर पुन्हा पक्षात घेण्यात आल्याने देसाई नाराज होते असे सांगितले जाते.

कॉर्बिन यांच्यावर गैरप्रकार केल्याचे आरोप होते. तथापि, सध्या मजूर पक्षात सत्ताधारी हुजूर पक्षाच्या तोडीस तोड नेता नाही. त्यामुळे नाईलाजाने कॉर्बिन यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले, असेही बोलले जाते. मात्र, कॉर्बिन कमालीचे वादग्रस्त व एकांगी धोरण मानणारे असल्याने त्यांच्या पुनर्पवेशाला अनेक मजूर पक्ष नेत्यांचा विरोध असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या पक्षात आंतर्गत मतभेद उफाळले असल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

मोठय़ा हल्ल्याच्या तयारीत पाक

Patil_p

भारताचा विकासदर 7.3 टक्के राहणार

Patil_p

काँगेसच्या अध्यक्षपदासाठी तीन नेत्यांची शर्यत

Patil_p

दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या 6 लाख 25 हजार 954 वर

Tousif Mujawar

अभिनेत्रीच्या हत्येतील दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p

युपीमध्ये कोरोनाचा विस्फोट : एका दिवसात तब्बल 20,510 नवे रुग्ण

Tousif Mujawar