Tarun Bharat

ब्रिटनमध्ये काकडीची अभूतपूर्व टंचाई

युक्रेनमध्ये सध्या जोरदार युद्ध सुरू आहे. ते थांबण्याचे नाव घेत नाही. या युद्धाचे विविध देशांवर विविध दुष्परिणाम होत आहेत. कोणत्याही युद्धाशी कोणताही थेट संबंध नसलेल्या पदार्थांच्या किमतीही या युद्धामुळे गगनाला भिडल्या आहेत. जगातील पाच महासत्तांपैकी एक मानल्या जाणाऱया ब्रिटनलाही याचा फटका बसला असून काकडीसारखा सामान्य पदार्थही नेहमीच्या दसपट महाग झाला आहे. सध्या ब्रिटनमध्ये एका काकडीचा दर 43 रुपये आहे.

ब्रिटनमध्ये जवळपास आठ महिने थंडीचे असतात. तर मार्च, एप्रिल, मे व जून हे चार महिने उन्हाळय़ाचे आणि आल्हाददायक असतात. याच काळात तेथे काकडी, स्ट्रॉबेरी, टोमॅटो, द्राक्षे, वेगवेगळय़ा प्रकारची पिचेस आणि बेरिज अशा ‘पाणीदार’ फळांची चलती असते. पण युक्रेन  युद्धामुळे पुरवठा साखळय़ा तुटल्यामुळे या सर्व पदार्थांची कधी नव्हे इतकी टंचाई या देशाला जाणवत आहे.

Advertisements

काकडीची टंचाई तर इतकी कडाक्याची आहे, की हॉटेल्सच्या मेनूकार्डांवरून काकडीयुक्त पदार्थांची हकालपट्टी करण्यात आली आहे. उन्हाळय़ाच्या चार महिन्यात अनेक हॉटेले काकडीचे पदार्थ ग्राहकांना खायला घालून बख्खळ पैसा कमावतात. ब्रिटनमध्ये या काकडय़ा आफ्रिकेतून आयात केल्या जातात. तथापि, यावेळी ब्रिटनला वेगळाच अनुभव येत आहे. ज्ञात भूतकाळात काकडय़ांची एवढी टंचाई कधीच जाणवली नव्हती, असे तेथील बुजुर्ग म्हणतात.

Related Stories

दक्षिण अमेरिका : 70 लाखांहून अधिक

Patil_p

नासाच्या दोन अंतराळवीरांसह ‘Space X’ रॉकेटचे अवकाशात यशस्वी उड्डाण

datta jadhav

बांगलादेशातील टाळेबंदी संपुष्टात

Patil_p

ब्राझीलमध्ये 68.75 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

सौदी अरेबियाचाही चीनला दणका; रद्द केला 10 अरब डॉलरचा करार

datta jadhav

कुलभूषण जाधव यांचा फेरविचार याचिकेस नकार; पाकचा दावा

datta jadhav
error: Content is protected !!