Tarun Bharat

ब्रिटनमध्ये कृष्णवर्णीय कलाकारांसोबत भेदभाव

Advertisements

जीओटी फेम नताली इमॅन्युएलचा दावा

गेम ऑफ थ्रोन्स आणि फास्ट अँड फ्यूरियस प्रेंचाइजी फेम ब्रिटिश अभिनेत्री नताली इमॅन्युएलने एका मुलाखतीत ब्रिटनच्या चित्रपटसृष्टीवर वर्णभेदाचा आरोप केला आहे. ब्रिटनमध्ये कृष्णवर्णीय कलाकारांना काम मिळत नाही, याचमुळे हे कलाकार अमेरिकेत पोहोचून काम करणे पसंत करत असल्याचे तिने म्हटले आहे.

मला जर माझ्या देशात काम मिळाले असते तर मी कधीच अमेरिकेत गेले नसते असे इंग्लंडच्या एसेक्समध्ये जन्मलेली नताली सांगते.  ब्रिटिश चित्रपटसृष्टीने आम्हाला कधीच मोकळेपणाने स्वीकारले नाही. माझ्यासारखे अनेक कृष्णवर्णीय कलाकार अमेरिकेत आले, कारण ब्रिटनमध्ये आम्हाला संधीच मिळत नव्हती असे तिने म्हटले आहे.

वर्णावर हॉलिवूडमध्येही काही मुद्दे आहेत. पण अमेरिकेतील चित्रपटसृष्टी प्रचंड मोठी असल्याने येथे विविध पार्श्वभूमीच्या लोकांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. ब्रिटन सोडून अमेरिकेत येणे करियरच्या दृष्टीकोनातून जोखिमीचे होते. पण प्रयत्न केल्यानेच मार्ग प्रशस्त होत असल्याचे मी मानते. जगाने माझ्या या निर्णयाला साथ दिली आणि मला स्वीकारले असल्याचे नतालीने मुलाखतीत नमूद केले आहे.

Related Stories

किर्गिस्तानात ‘सालबुरुन’ महोत्सवाची धूम

Patil_p

अमेरिकेत 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण

datta jadhav

भारताचा जवळचा मित्र रशियानं तालिबान्यांचं केलं कौतुक

Archana Banage

इस्लामोफोबियावर बंदी घालण्याची इम्रान खान यांची मागणी

datta jadhav

जगभरात 17 लाख कोरोना रुग्ण, बळींची संख्या एक लाखावर

prashant_c

रशियाविरोधात युरोपीय महासंघाचे मोठे पाऊल

Patil_p
error: Content is protected !!