Tarun Bharat

ब्रिटनमध्ये दुसरी लाट

ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे. सरकार आता कुठल्याही दबावात न येता सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क संबंधी कठोर नियम लागू करणार आहे. स्थिती बिघडण्यापूर्वी आम्हाला कठोर पावले उचलावीच लागतील असे जॉन्सन यांनी नमूद केले आहे. दिवसभरात देशात एकूण 4,332 नवे रुग्ण सापडले आहेत.

ट्रम्प यांचे नवे आश्वासन

कोरोना विषाणूवरील लस एप्रिलपर्यंत प्रत्येक अमेरिकन नागरिकापर्यंत पोहोचणार असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.  सल्लागार वारंवार लसीसंबंधी कुठलेही आश्वासन देऊ नये असा सल्ला देत आहेत. लससंबंधी अमेरिकेतील मंजुरी प्रक्रिया उर्वरित देशांच्या तुलनेत अधिक कठोर आहे. याचमुळे लसविषयक कालमर्यादा निश्चित केली जाऊ शकत नाही.

प्रवाससंबंधी दिलासा

Russian medical experts prepare to check passengers arriving from Italy at Sheremetyevo airport outside Moscow, Russia, Sunday, March 8, 2020. The Russian authorities have ordered mandatory medical checks upon arrival for all those who arrive from countries with high a level of coronavirus cases and ordered them to stay home for two weeks. (AP Photo/Alexander Zemlianichenko)

ऑस्ट्रेलियातील केंद्र तसेच प्रांतीय सरकारांनी प्रवासविषयक निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेत याकरता तयारीही सुरू केली आहे. न्यू साउथ वेल्स, क्वीन्सलँड आणि पश्चिम ऑस्ट्रेलियात आगामी काही दिवसांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु देशात येणाऱया लोकांना हॉटेल्समध्ये क्वारंटाईन रहावे लागणार आहे. सुमारे 4 ते 6 हजार ऑस्ट्रेलियन दर आठवडय़ाला मायदेशी परतत आहेत.

फिलिपाईन्स : आणीबाणी

फिलिपाईन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुर्तेते यांनी महामारी पाहता देशातील राष्ट्रीय आणीबाणीला मुदतवाढ दिली आहे. ही आणीबाणी आता पुढील वर्षाच्या 12 सप्टेंबरपर्यंत कायम राहणार आहे. परंतु अधिकाऱयांनुसार संसर्गावर नियंत्रण मिळाल्यास याचा कालावधी कमी केला जाऊ शकतो. फिलिपाईन्समध्ये रुग्णसंख्या वाढू लागलने प्रशासनाने कठोर भूमिका स्वीकारली आहे.

नेपाळ : 2 हजार रुग्ण

नेपाळमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मागील 24 तासांत देशात 2,023 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण आकडा 61,653 वर पोहोचला आहे. नेपाळमध्ये पहिल्यांदाच एका दिवसात 2 हजाराहून अधिक नवे बाधित सापडले आहेत. नेपाळमधील मृत्यूदरही वाढत आहे. मृतांची संख्या 390 वर गेली आहे.

फ्रान्समध्ये स्थिती बिघडली, संसर्ग तीव्र फ्रान्समध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट अत्यंत वेगाने फैलावली आहे. ऑगस्टमध्ये देशाच्या बहुतांश हिस्स्यांमध्ये संसर्गावर नियंत्रण मिळविल्यावर फ्रान्समध्ये दुसरी लाट दिसून येत आहे. देशात दिवसभरात 13 हजार 215 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 154 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशातील बळींचा

Related Stories

हेलिकॉप्टरवर लटकून 25 पूल-अप

Patil_p

इस्राईलमध्ये 27 डिसेंबरपासून लसीकरणाला सुरुवात

datta jadhav

हवामान बदलाने भारतही प्रभावित

Patil_p

नाक, ओठ, बोटं कापून घेणारा ‘ब्लॅक एलियन’

Patil_p

बेडकांशी बोलणारा प्राध्यापक

Patil_p

देशाच्या राजधानीत ओमिक्रॉनचा शिरकाव; देशात पाचवा रुग्ण सापडला

Abhijeet Khandekar