Tarun Bharat

ब्रिटनमध्ये मार्चपर्यंत टाळेबंदी

Advertisements

ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू झाले असले तरीही कोरोनाचा फैलाव कमी झालेला नाही. याचमुळे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारने मार्चपर्यंत देशभरात कठोर टाळेबंदीचे निर्देश दिले आहेत. ही टाळेबंदी 7 आठवडय़ांची राहणार आहे. कोरोनाबळींचा आकडा 1 लाखापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी ब्रिटन सरकारने प्रयत्न चालविले आहेत. देशात आतापर्यंत 75 हजारांपेक्षा अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 22 फेब्रुवारीपर्यंत निर्बंधांमध्ये दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर सरकारने फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत शाळा बंद ठेवण्याचीही घोषणा केली आहे. घरातच राहण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले आहे. 4 जानेवारीच्या रात्रीपासून अनावश्यक दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. नव्या संकरावताराच्या पार्श्वभूमीवर हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Related Stories

बलुचिस्तानात दहशतवादी हल्ला; 14 ठार

datta jadhav

सर्वसमावेशक सरकार स्थापन करणार

Patil_p

कॅनडाच्या भगवद्गीता पार्कमध्ये तोडफोड

Omkar B

पाकिस्तानात जवळजवळ १ हजार लोकांचा मृत्यू; पूरपरिस्थितीमुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

Abhijeet Khandekar

अमेरिकाही घालणार ‘टिकटॉक’वर बंदी

datta jadhav

9999 सालापर्यंत सोडता येणार नाही देश

Patil_p
error: Content is protected !!