Tarun Bharat

ब्रिटनमध्ये हॉटेलचे 50 टक्के बिल सरकार भरणार

ऑनलाईन टीम / लंडन : 

ब्रिटनमध्ये कोलमडून पडलेला हॉटेल व्यवसाय सावरण्यासाठी यूकेचे चान्सलर ऋषि सनक यांनी ‘इट आऊट टू हेल्प आऊट’ ही अभिनव योजना आणली आहे. या योजनेद्वारे सरकार हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणाऱ्या ग्राहकांचे अर्धे बिल भरणार आहे.

सरकारच्या ‘इट आऊट टू हेल्प आऊट’ या योजनेचा यूकेमधील 53 हजारांपेक्षा जास्त हॉटेल्स आणि कॅफेला फायदा फायदा होणार आहे. या योजनेतंर्गत संपूर्ण ऑगस्ट महिन्यात सोमवार ते बुधवारपर्यंत खाद्यपदार्थ आणि मद्य या व्यतिरिक्त अन्य पेयांवर 50 टक्के सवलतीपासून प्रतिव्यक्ती 10 पाऊंडापर्यंत सवलत मिळणार आहे. पार्सल धारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

हॉटेल व्यावसायिक आणि कामगारांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांची नोकरी टिकून रहावी, यासाठी ही योजना आणल्याचे सनक यांनी सांगितले.

Related Stories

Kolhapur; शहरवासीय जलमुखांवर…पात्रता फेरीतच यंत्रणा नापास

Abhijeet Khandekar

प्रदीप शर्मा यांच्या अडचणींमध्ये वाढ; 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत

Tousif Mujawar

“उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत मोठं म्हणून…”, अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Archana Banage

चिंताजनक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 381 पोलिसांना कोरोना विषाणूचा संसर्ग; 3 मृत्यू

Tousif Mujawar

चर्चिल, शेक्सपियर अन् 1940 ची ‘हार’

Patil_p

ऑस्ट्रेलियात दिलासा

Patil_p