ब्रिटनमध्ये सरकारने लागू केलेले निर्बंध 6 महिन्यांपर्यंत कायम राहणार असल्याचे वृत्त आहे. परंतु या निर्बंधांना लोकांकडून विरोध सुरू आहे. विवाहसोहळे आणि क्रीडास्पर्धांवरही बंदी घातली जाऊ शकते. फुटबॉल सामन्यांविषयी नव्याने विचार केला जाणार आहे. तेथे मोठय़ा प्रमाणात लोक एकत्र येतात. अंत्यसंस्कारात 30 पेक्षा अधिक जणांना सामील होता येणार नाही. सर्वांना मास्कचा वापर करावा लागणार आहे. लंडन आणि देशाच्या उर्वरित भागात चालणाऱया टॅक्सींसंबंधीही नव्या मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या जाऊ शकतात असे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे.


next post