Tarun Bharat

ब्रिटिश महाराणीच्या हत्येसाठी पोहोचला भारतीय शीख

जालियांवाला बाग नरसंहाराचा घेऊ इच्छित होता सूड

वृत्तसंस्था/ लंडन

जालियांवाला नरसंहाराचा सूड घेण्यासाठी एक व्यक्ती ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या महालात धनुष्यबाण घेऊन शिरला. महाराणी एलिझाबेथ द्वितीय या नाताळ साजरा करण्यासाठी विंडसर कॅसलमध्ये आल्या आहेत. संबंधित हल्लेखोर जसवंत सिंह चैल 19 वर्षांचा आहे. पोलिसांनी त्याला मानसिक आरोग्य कायद्याच्या अंतर्गत ताब्यात घेतले आहे.

लंडन पोलिसांकडून त्याच्या मानसिक आरोग्याची तपासणी करविली जात आहे. जसवंत सिंहला वैद्यकीय कर्मचाऱयांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे. जसवंत याच्या महालातील घुसखोरीची एक चित्रफित समोर आली असून यात तो धनुष्यबाणासह  दिसून येतोय. जसवंतने नाताळाच्या दिनी स्नॅपचॅटवर एक व्हिडिओ अपलोड केला होता.

जसवंतने स्वतःचा आवाज लपविण्यासाठी फिल्टरचा वापर केला होता. त्याने हूडी आणि मास्क परिधान केला होता. “मला माफ करा. मी जे काही करेन त्यासाठी माफ करा. एलिझाबेथ द्वितीय यांच्या हत्येचा प्रयत्न मी करणार आहे. हा 1919 मध्ये जालियांवाला बाग नरसंहारात मारले गेलेल्या लोकांचा सूड आहे. मी एक भारतीय शीख आहे’’ असे जसवंत म्हणत असल्याचे या व्हिडिओत दिसून येते. जालियांवाला बाग नरसंहारात 379 लोकांना इंग्रजांच्या गोळीबारात जीव गमवावा लागला होता. तर 1200 हून अधिक जण जखमी झाले होते.

Related Stories

सोलोमन बेटांवर आढळला बालकाच्या आकाराचा बेडूक

Patil_p

कोहिनूरयुक्त मुकूटाला नव्या राणीचा नकार

Patil_p

युक्रेनच्या हल्ल्यात रशियाच्या 63 सैनिकांचा मृत्यू

Patil_p

आर्क्टिकवरील हिमावर आधुनिक पद्धतीने लक्ष

Patil_p

कॅनडात मुस्लीम कुटुंबाला चिरडल्याने क्षोभ

Patil_p

नेपाळमध्ये पूर, 3 भारतीयांसह 20 बेपत्ता

Amit Kulkarni