Tarun Bharat

ब्रिटीशकालिन बोगद्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केली पाहणी

प्रतिनिधी/ सातारा

सातारा हे शहर छत्रपती शाहु महाराजांनी वसवलेले शहर आहे. याच शहरात आजही अनेक ऐतिहासिक वास्तू पहायला मिळतात. त्यापैकीच ब्रिटीशकालिन बोगदा असून त्या बोगद्याची तात्पुरती डागडुजी बांधकाम विभागाने चार वर्षापूर्वी केली होती. मात्र, या बोगद्याकडे बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून बोगद्याची पूनर्जीवन करण्यात यावे, अशी मागणी पाहणीदरम्यान माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी केलेली आहे.

कराड, सांगली याबाजूकून पुर्वी सातारा शहरात जाण्या येण्यासाठी किल्ले अजिंक्यताऱयाच्या बाजूने रस्ता होता. ब्रिटीशांनी त्यावेळी दळणवळणाकरता बोगदा तयार केल्याचे साताऱयातील जाणकार सांगतात. हाच बोगदा सध्या परळी भागातील नागरिक जाण्या येण्यासाठी वापरतात. गेल्या काही वर्षामध्ये या बोगद्याची दुरावस्था झालेली असून पावसाचे बोगद्याच्या आतमध्ये पाझरते आहे. भवेष्यात मोठी दुघर्टना घडू शकते. त्या पार्श्वभूमीवर बोगद्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. गेल्या चार वर्षापूर्वी बोगद्याच्या उत्तर बाजूच्या दिशेची पडझड झाली होती. बांधकाम विभागाने तात्पुरती दुरुस्ती केली होती. त्यापूर्वी दक्षिण बाजूची पडझड झाली होती. या झालेल्या पावसामुळे या बोगद्याला काही झाले नाही ना याची पाहणी नगरसेवक सुहास राजेशिर्के यांनी केली. बांधकाम विभागाचे याकडे दूर्लक्ष असून लवकरात लवकर या बोगद्याची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केलेली आहे.

Related Stories

”ओबीसींना कशाच्या आधारे वैद्यकीय प्रवेशात 27 टक्के आरक्षण दिलं?”

Archana Banage

महाराष्ट्र : नागपूरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

वडिलांना विचारून आलायं का ?

Archana Banage

प्रतापसिंह हायस्कूलमध्ये ब्रिटिशकालीन प्रयोगशाळा

Archana Banage

युट्युबवरील त्या व्हिडिओप्रकरणी अंनिसने पोलिसांत केली तक्रार

Archana Banage

दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा

Abhijeet Khandekar