Tarun Bharat

ब्रेड पराठा

साहित्य : 4 पांढरा अथवा गहू (ब्राऊन) बेड स्लाईस, अर्धी वाटी रवा, पाव वाटी दही, 1 वाटी पाणी, 1 चमचा तांदळाचे पीठ, पाव चमचा हळद पावडर, चवीपुरते मीठ, 1 गाजर खिसून, 1 शिमला मिरची छोटे तुकडे करून, 2 बीन्स छोटे तुकडे करून, 1 टोमॅटो बारीक चिरून, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आवश्यकतेनुसार

कृती : ब्रेडचे छोटे तुकडे करून त्यात रवा, दही आणि पाणी मिक्स करावे. तयार मिश्रण मिक्सरला लावून पातळ मिश्रण बनवावे. नंतर त्यात तांदळाचे पीठ, हळद पावडर आणि मीठ मिक्स करावे. आता त्यात गाजर, शिमला मिरची, बीन्स, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून मिश्रण छान एकजीव करावे. गॅसच्या मंद आचेवर तवा गरम करून त्यावर तेलाचे थेंब पसरवावेत. त्यावर वाटीभर मिश्रण ओतून त्याला गोलाकार आकार द्यावा. कडेने तेलाचे थेंब सोडून पराठा दोन्ही बाजूने लालसर रंगावर आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजावे. तयार बेड पराठा ग्रीन चटणी आणि टोमॅटोसॉस सोबत खाण्यास द्या.

टीप : बेडऐवजी पावही वापरू शकता.

Related Stories

World Vegetarian Day : ‘या’ ६ शाकाहारी पदार्थात आहेत भरपूर प्रथिने,मांसाहाराला ही टाकतील मागे

Archana Banage

झटपट होणारे स्वादिष्ट आणि कुरकुरीत आप्पे

Kalyani Amanagi

मँगो करी

Omkar B

हलवाईसारखी परफेक्ट आणि खुसखुशीत बालुशाही

Kalyani Amanagi

Diwali Food : घरच्या घरी कढईत बनवा नान-कटाई,जाणून घ्या रेसीपी

Archana Banage

कुमाऊंला आलात तर या पारंपारिक चवींचा आस्वाद नक्की घ्या..

Kalyani Amanagi