Tarun Bharat

ब्रेन टय़ुमरची लक्षणे ओळख

Advertisements

ब्रेन टय़ूमर हा जीवघेणा आजार आहे. कोणत्याही आजाराचे निदान वेळीच झाले तर त्यावर उपचार करुन नियंत्रण मिळवणे शक्य होऊ शकते. ब्रेन टय़ुमरचेही तसेच आहे. वेळीच त्याची लक्षणे कळल्यास त्यावर औषधोपचार करुन रुग्णाचा जीव वाचवता येऊ शकतो. कशी ओळखायची याची लक्षणे?

सतत होणारी डोकेदुखी, हळुहळु डोकेदुखीचा त्रास गंभीर होणे हे देखील ब्रेन टय़ूमरचे संकेत असतात.असह्य वेदना होत असतील तर डॉक्टरशी जरूर संपर्क करावा.

  • मेंदूतील टय़ूमर किंवा गाठ एखाद्या व्यक्तीच्या वर्तणूक किंवा व्यक्तिमत्वामध्ये मोठे बदल घडवून आणण्याचे कारण ठरू शकतो. टय़ूमर असलेल्या लोकांना गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचणी येतात. त्यामुळे अशा व्यक्ती गोंधळलेल्या असतात.
  • पोट अस्वस्थ असणे किंवा आजारी असल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसत असतील तर हे टय़ूमरचे संकेत अशू शकतात. तीव्र वेदना आणि उलटी होणे हे देखील ब्रेन टय़ूमरचे प्रारंभिक लक्षण असू शकते.
  • अंधुक नजर, गोष्टी दोन दोन दिसणे आणि दृष्टी कमजोर होणे किंवा हानी होणे ही सर्व लक्षणे टय़ूमरशी निगडीत आहेत. वस्तू पाहताना डाग असल्यासारखे किंवा एखादा आकार असल्यासारखे दिसू शकते. रंग ओळखण्यात समस्या येऊ शकतात. ही लक्षणे ब्रेन टय़ूमरची अर्थात मेंदूत गाठ निर्मितीची सुरूवात असू शकते.
  • कोणत्याही प्रकारचा टय़ूमर असला तरीही चक्कर येणे किंवा फीट येणे या समस्येच्या प्रारंभिक लक्षणांपैकी एक आहे. टय़ूमर मुळे होणार्या जळजळीमुळे मेंदूचे न्यूरॉन्स अनियंत्रित होतात आणि असामान्य हालचाली होतात. टय़ूमर प्रमाणेच चक्कर किंवा फीटही काही प्रकारात येते. ब्रेन टय़ूमर किंवा मेंदूत गाठ निर्माण झाल्यास स्नायू आखडतात. काही वेळा त्यामुळे व्यक्ती बेशुद्धही पडू शकते.
  • शरीर किंवा चेहर्याची एक बाजू बधीर होणे किंवा सुन्न पडणे. विशेषतः टय़ूमर किंवा गाठ ही मेंदूच्या स्टेम किंवा पेशीवर तयार झाला असेल तर चेहर्याची एक बाजू सुन्न होते. कारण या जागी मेंदू आणि मणका जुळलेले असतात.
  • व्यक्ती किल्ली उचलून घेताना अडखळत असेल, चालताना पाय उचलत नसतील किंवा संतुलन साधण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तसेच हात किंवा पाय दोन्ही आखडले असतील तर मेंदूमध्ये गाठ किंवा टय़ूमर असण्याचे हे संकेत असू शकतात. बोलताना, घास गिळताना किंवा चेहर्यावरील हावभाव नियंत्रित करण्यास त्रास होत असेल, समस्या येत असेल तर ही नक्कीच मोठी समस्या आहे.

– डॉ. अतुल कोकाटे

Related Stories

अंडर आर्म्सचा काळपटपणा घालवायचा असेल तर…हे उपाय करून बघा

Kalyani Amanagi

जेवण आणि झोप

tarunbharat

अधोमुखवृक्षासन

Omkar B

‘COVAXIN’ च्या मानवी चाचणीस सुरुवात

datta jadhav

व्हाईट फंगसची समस्या

Amit Kulkarni

World Brain Tumor Day 2022 : जाणून घ्या, ब्रेन ट्यूमरची लक्षणे अन् उपचार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!