Tarun Bharat

ब्लादिमीर पुतीन यांचे रशियात नवे डावपेच

Advertisements

राष्ट्रपतिपदाच्या अमर्याद कार्यकाळास विरोध

वृत्तसंस्था/ मॉस्को

कुठल्याही नेत्याच्या राष्ट्रपती पदावरील अमर्याद कार्यकाळास विरोध असल्याचे उद्गार रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी काढले आहेत. अमर्याद कार्यकाळाचा प्रकार सोव्हिएत संघात चालत होता, असेही त्यांनी म्हटले आहे. पुतीन स्वतः 21 वर्षांपासून कधी देशाचे राष्ट्रपती तर कधी पंतप्रधान राहिले आहेत.

पुतीन यांनी बुधवारीच रशियाच्या घटनेत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. राजकीय शक्तींचे विभाजन अधिक उत्तम प्रकारे केले जाणार आहे. हे अधिकार राष्ट्रपतांपासून संसद, राज्य परिषद आणि शासकीय संस्थांना दिले जाणार असल्याचे पुतीन यांनी म्हटले होते. या माध्यमातून पुतीन हे राजकारणावरील स्वतःची पकड अधिक घट्ट करू पाहत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

घटनादुरुस्तीचा लाभ

पुतीन यांच्या घटनादुरुस्तीच्या घोषणेसोबतच पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींकडे असलेले अधिकार संसद तसेच मंत्रिमंडळाला देण्याचा पुतीन यांचा विचार आहे. या माध्यमातून ते सरकारला बळकट करू पाहत आहे. तसेच पुढील कार्यकाळात राष्ट्रपती न होता पंतप्रधानपद स्वीकारण्याचा त्यांचा मानस असावा.

 

 

Related Stories

अमेरिकेत वाढता संसर्ग

Patil_p

रेमडेसिविर मंजूर, जीव वाचविण्यास अपयशी

Patil_p

पतीच्या पूर्वाश्रमीला पत्नीला किडनी दान

Patil_p

अल साल्वाडोरमध्ये पहिली बिटकॉइन सिटी

Patil_p

बोली भाषा संपणार, वनौषधींचे ज्ञान धोक्यात

Patil_p

द्विपक्षीय संबंधांवर भारताची सिंगापूरशी चर्चा

Patil_p
error: Content is protected !!