Tarun Bharat

ब्लॅक फंगसवरील इंजेक्शन मिळणार 1,200 रुपयात

औषधांच्या उपलब्धतेबाबत पंतप्रधानांचेही महत्त्वाचे निर्देश

वर्धा, नवी दिल्ली / वृत्तसंस्था

ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी आतापर्यंत बाजारात 7 हजार रुपयात मिळणारे इंजेक्शन अवघ्या 1,200 रुपयात उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या इंजेक्शनचे लॉन्चिंग करण्यात आले. कोरोना विषाणूच्या दुसऱया लाटेदरम्यान आता ब्लॅक फंगसचे रुग्णही वाढत आहेत. हा आजार अधिक खर्चिक असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असतानाच ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱया इंजेक्शनबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

देशात एम्फोटेरिसिन बी ईमल्शन इंजेक्शनचे उत्पादन आतापर्यंत एकच कंपनी करीत होती. मात्र आता वर्ध्याची जेनटेक लाईफ सायन्सदेखील हे इंजेक्शन तयार करणार आहे. जेनटेक लाईफ सायन्सची दररोज तब्बल 20 हजार वायल उत्पादन करण्याची क्षमता आहे. दुसरीकडे दिल्ली उच्च न्यायालय हे केंद्राकडून निर्णय येईपर्यंत काळय़ा बुरशीच्या रुग्णांवरील उपचारासाठी आयातकांद्वारे करार पत्रावर एम्फोटेरिसिन बीवर कररहित आयात करण्याची परवानगी दिली आहे. येत्या सोमवारपासून त्याचे वितरण सुरु होणार आहे. या औषधांचे उत्पादन वाढविण्यासाठी भारत सरकारने आणखी पाच आणखी कंपन्यांना परवाना उपलब्ध करुन दिला आहे. 

मिळेल तिथून औषधे उपलब्ध करा : पंतप्रधान

केंद्रातील मोदी सरकारने ब्लॅक फंगस (म्यूकरमायकोसिस) संबंधित औषधाची कमतरता दूर करण्यासाठी युद्ध मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूनंतर महामारीचे रूप धारण केलेल्या काळय़ा बुरशीच्या औषधाची व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतली आहे. ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी लिपोसोमल एम्फोटेरिसिन बी नावाचे एक इंजेक्शन वापरले जाते. जगाच्या कोणत्याही कोपऱयात हे औषध मिळाल्यास ते भारतात आणावे, असे पंतप्रधान मोदींनी अधिकाऱयांना सूचना दिल्या आहेत. 

ब्लॅक फंगसचे वाढते रुग्ण आणि त्यावर औषधांच्या बाबतीत पंतप्रधान मोदी वरि÷ अधिकाऱयांशी सतत चर्चा करत आहेत. याच चर्चेदरम्यान, जगातील कोणत्याही देशात हे औषध मिळत असेल तर ते त्वरित भारतात आणले जावे, असे पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर जगभरातील भारतीय दुतावासांची मदत घेतली जात आहे.

अमेरिकेची तातडीने मदत पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांना अनुसरून अमेरिकेच्या गलियड सायन्सेस नावाच्या कंपनीने मदत केली आहे. ही कंपनी भारतात रेमेडिसवीर देखील पुरवित आहे. आता ही कंपनी एम्फोटेरिसिन बी देखील भारताला उपलब्ध करुन देत आहे. आतापर्यंत 1,21,000 डोस भारतात पाठवल्या गेल्या आहेत. लवकरच 85,000 डोस भारतात येणार आहेत.

Related Stories

ग्रामीण महिलांना पंतप्रधानांकडून मोठी भेट

Patil_p

आसाममध्ये भाजपचे उमेदवार घोषित

Patil_p

चौकशी अधिकाऱयाचीच चौकशी

Patil_p

गलवान संघर्ष चीननेच घडविल्याचा अमेरिकेचा अहवाल

Omkar B

रिटा बहुगुणांवर पायलट यांची टीका

Patil_p

26 रोजी भारत बंदची हाक

Patil_p