Tarun Bharat

ब्लॅक फंगसवरील औषधांचा तुटवडा

शनिवारी सायंकाळपर्यंत रुग्णसंख्या 210

प्रतिनिधी / बेळगाव

जिल्हय़ातील ब्लॅक फंगसच्या रुग्णातही घट होत चालली आहे. गेल्या आठवडय़ात जिल्हय़ातील 202 जणांना ब्लॅक फंगसची लागण झाली होती. शनिवारी सायंकाळपर्यंत एकूण रुग्णसंख्या 210 वर पोहोचली असून औषधांचा तुटवडा भासत असल्याचे सांगण्यात आले.

ब्लॅक फंगसने त्रस्त असणाऱया अधिकाधिक रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. आरोग्य विभागातील वरि÷ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा 15 इतका आहे. 43 हून अधिक जणांना शस्त्रक्रियेची गरज आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हुबळी, गदग येथील डॉक्टरांची सेवा घेण्यात येत आहेत. ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी आवश्यक औषधांचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुटवडा असल्याचा आरोप केला जात आहे. आरोग्य विभागातील अधिकाऱयांच्या मते मात्र सरकारने गोळय़ा आणि इंजेक्शन पुरविले असून जे उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल होतात त्यांना ते उपलब्ध केले जात आहेत.

खासगी इस्पितळात उपचार घेणाऱया ब्लॅक फंगस बाधितांवर उपचारासाठी संबंधित इस्पितळ प्रशासनाने ड्रग कंट्रोलरकडे मागणी केल्यास त्यांना औषध पुरविले जात आहे. मात्र, काही रुग्णांच्या नातेवाईकांच्या मते औषधाचा तुटवडा आहे. राज्य सरकारने बिम्समधील कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी प्रादेशिक आयुक्त आमलान आदित्य बिस्वास यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी बऱयाच सुधारणा केल्या असून शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांची धडपड सुरू आहे.

Related Stories

तरुण भारत सौहार्द सोसायटीचे आकर्षक व्याजदर

Amit Kulkarni

कोगनोळी नाक्याला पोलीस छावणीचे स्वरुप

Amit Kulkarni

संकेश्वरकरांवर कोरोनानंतर डेंग्यू संकट

Patil_p

तनिष्का काळभैरव, रैनेश जलान टेटे स्पर्धेत विजेते

Amit Kulkarni

एम. आर. भंडारे स्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश

Amit Kulkarni

विनातिकीट प्रवास करणाऱयांना रेल्वेचा दणका

Amit Kulkarni