Tarun Bharat

ब्लॅक फंगसवरील औषधे करमुक्त

Advertisements

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोनाशी संबधित औषधे आणि इतर वैद्यकीय वस्तूंवरील करांबाबत केंद्र सरकारने शुक्रवारी मोठा निर्णय जाहीर केला. ब्लॅक फंगसवरील औषधे करमुक्त केली असून कोरोना लसीवर 5 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. तसेच कोरोनाशी संबंधित इतर वैद्यकीय वस्तूंवरील करही कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेने सध्या जारी केलेली करकपात 30 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. हँड सॅनिटायझर, टेम्परेचर चेक इक्विपमेंट यावरील जीएसटी दरातही घट करण्यात आली असून ते 5 टक्के करण्यात आले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जीएसटी परिषदेची 44 वी बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंत्रिगटाने दिलेल्या शिफारशींना मान्यता देण्यात आली. या बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि अर्थ मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अर्थमंत्री आणि वरि÷ अधिकारीही व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले होते. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्णयांची माहिती दिली.

जीएसटी परिषदेने ब्लॅक फंगस म्हणजे म्युकर मायकोसिसवरील सर्व औषधे करमुक्त (टॅक्स फ्री) करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर ऍम्ब्युलन्सवरील जीएसटी 28 टक्क्मयांवरून आता 12 टक्क्मयांवर आणण्यात आला आहे. तर दुसरीकडे रेमडेसिवीरवरील जीएसटी 12 टक्क्मयांवरून 5 टक्क्मयांवर आणण्यात आला आहे. कोरोना संकटादरम्यान अनेक वस्तूंवर 12 ते 18 टक्के जीएसटी लागत होता. परंतु तो आता 5 टक्के करण्यात आला आहे.

ऍम्ब्युलन्सवरील कर 28 ऐवजी 12 टक्के

कोरोना संकटादरम्यान ऍम्ब्युलन्स सेवांनी लोकांचे प्राण वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. भविष्यातही ऍम्ब्युलन्सचा वापर आणि महत्त्व कायम राहणार असल्याने त्यावरील जीएसटी 28 टक्क्मयांवरून 12 टक्के करण्यात येत असल्याची दिलासादायी घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली आहे.

कोरोना लसीवरील जीएसटी कायम

कोरोना लसीवर 5 टक्के जीएसटी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने यापूर्वीच हा दर 5 टक्के इतका निर्धारित केला होता. तो कायम ठेवण्यात आला आहे. कोरोनाच्या 75 टक्के लसी केंद्र सरकार खरेदी करून राज्यांना वितरित करणार असल्याने त्याचा थेट भार नागरिकांवर पडणार नाही.

वैद्यकीय उपकरणेही होणार स्वस्त

कोरोनावर महत्त्वाचे ठरणाऱया रेमडेसिवीर इंजेक्शनवरील जीएसटी 12 टक्क्मयांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. त्याचप्रमाणे ऑक्सीमीटर, वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणारा ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर यांच्यावरील 12 टक्के जीएसटी घटवून 5 टक्के करण्यात आला आहे.

मंत्रिगट समितीच्या शिफारशी मंजूर

कोरोना संबधित वैद्यकीय वापराच्या वस्तूंवरील जीएसटीबाबत सूचना करण्यासाठी मंत्रिगटाची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशींना बैठकीत मंजुरी देण्यात आली. मेघालयचे उपमुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने 8 जूनला त्यांच्या शिफारशी सरकारला सादर केल्या होत्या.

Related Stories

जीवघेणी चुरस…अखेर रालोआच सरस

Omkar B

देशात लवकरच मिश्र लसीकरण?

datta jadhav

काय सांगताय? दागिने विकून अंबानी काढताहेत दिवस!

Patil_p

एक रुपयाच्या दंडाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

Patil_p

अमरिंदर सिंग यांनी सांगितला नव्या पक्षासाठी युतीचा फॉर्म्युला

Abhijeet Shinde

महाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मीरमध्ये वीरमरण

Patil_p
error: Content is protected !!