Tarun Bharat

ब्लॅक फंगस : कर्नाटकात आतापर्यंत ३०३ रुग्णांचा मृत्यू

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात तब्बल ३०३ जणांचा ब्लॅक फंगसने मृत्यू झाला आहे, त्यापैकी १०४ रुग्ण एकट्या बेंगळूर मधील आहेत, असे आरोग्य विभागाने नोंदवलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

राज्यभरातून सुमारे ३,५१४ ब्लॅक फंगस रूग्णांचे निदान (11 जुलै पर्यंत) झाले आहे. त्वचेमध्ये बहुतेक वेळा हा विषाणू दिसून येतो आणि फुफ्फुस आणि मेंदूवर परिणाम करतो. दरम्यान, ब्लॅक फंगस संसर्ग मृत्यूचे प्रमाण (सीएफआर) ८.६२ टक्के आहे, जे कोविड -१९ रूग्णांमधील सीएफआर (२.८३ टक्के) पेक्षा जास्त आहे.

बेंगळूरमध्ये ब्लॅक फंगस संसर्गाची १,१२० प्रकरणे नोंदली गेली, तर इतर जिल्ह्यांमध्ये धारवाड (२७९), विजयपुरा (२१०), गुलबर्गा (१९९) आणि बेळगाव (१५९) रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

कर्नाटक: ‘या’ १५ जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त

Abhijeet Shinde

कर्नाटकमध्ये मागील तासात १ हजार ६६९ नवीन रुग्ण, तर २२ मृत्यू

Abhijeet Shinde

मी मंत्रीपदासाठी इच्छुक नव्हतो: विजयेंद्र

Abhijeet Shinde

कर्नाटक : ८०.७२ टक्के रुग्णांची कोरोनावर मात

Abhijeet Shinde

कर्नाटक : सरकारने न्यायालयीन चौकशी करण्याचे धाडस करावे

Abhijeet Shinde

विवाहित मुलीलाही अनुकंपा तत्वावर नोकरीची संधी

Omkar B
error: Content is protected !!