Tarun Bharat

ब्लॅक संडेने नागरिक हैराण

Advertisements

वर्षाचा पहिलाच रविवार ‘विजेविना’

प्रतिनिधी / बेळगाव

वीज यंत्रणेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी हेस्कॉमकडून रविवारी शहराच्या अर्ध्याहून अधिक भागात वीजपुरवठा खंडित केला होता. नवीन वर्षाच्या पहिल्याच रविवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत वीज नसल्याने नागरिक हैराण झाले होते. साप्ताहिक सुटी असूनही विजेअभावी त्यांची सुटी वाया गेली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात होती.

औद्योगिक वसाहतीबरोबरच शहराच्या अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. उद्यमबाग, टिळकवाडी, शहापूर, सदाशिवनगर, शहराचा मुख्य भाग, ऑटोनगर, रामतीर्थनगर, कणबर्गी रोड या परिसरात रविवारी वीज नसल्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले होते. दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती हेस्कॉमने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली होती. तरीदेखील अर्ध्याहून अधिक शहर परिसरात वीज नसल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला.

व्यापाऱयांना बसला फटका

साप्ताहिक सुटी असल्याने नोकरदार रविवारी खरेदीसाठी बाहेर पडतात, परंतु या रविवारी वीज नसल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर झाला. व्यावसायिकांना दिवसभर जनरेटरचा आधार घेत व्यवसाय सुरू ठेवावा लागला. यासाठी डिझेलचा अतिरिक्त खर्च करावा लागला. ज्यांच्याकडे जनरेटर नाही त्यांनी आपली दुकाने बंद ठेवणेच पसंत केले. यामुळे व्यापाऱयांमधूनही ब्लॅक संडेबाबत नाराजी व्यक्त केली जात होती. 

Related Stories

‘ऍक्सेस’कडे मोहन मोरे बीपीएल चषक

Amit Kulkarni

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासक्रम

Omkar B

शरद पै यांना रोटरी फौंडेशन-रोटरी क्लबचा पुरस्कार

Patil_p

खानापूर तालुक्यातील वीट उत्पादकांना पावसाचा फटका

Omkar B

बेळगावच्या उत्तर भागातही चुरशीने मतदान

Amit Kulkarni

महापौर-उपमहापौर निवड लांबणीवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!