घरभाडय़ासाठी त्रस्त राहणाऱया लोकांसाठी एक नव्या प्रकारची लाइफस्टाइल विकसित होतेय. हे लोक स्थायी घराच्या फंदात न पडता जुन्या व्हॅन्समध्ये स्वतःचा संसार थाटत आहेत. कॅम्ब्रिज येथे राहणाऱया एका ब्रिटिश युवतीने असेच काही केले आहे. वयाच्या 21 व्या वर्षीच एमिलिस बरने फ्लॅटचा नाद सोडून भंगारातील गोष्टी जोडून व्हॅनमध्येच स्वतःचे जग थाटले आहे.
एमिलिसने कमी वयात मोठी बचत केली आणि स्वतःच्या कौशल्याचा वापर करून तिने स्वतःचे घर तयार केले आहे. टिकटॉकवर आता या युवतीने लोकांना स्वतःच्या घराची झलक दाखवत आपण स्वस्त आणि मोफत सामग्रीतून एका व्हॅनला गुलाबी रंगात रंगवूत स्वतःसाठी तयार केल्याचे सांगितले आहे. येथे राहत असताना तिला कुठल्याही प्रकारचे भाडे द्यावे लागत नाही.


एमिलिस बरच्या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाख ह्यूज मिळाले आहेत. दीड वर्षात तिने साधारण व्हॅनला कॅम्परव्हॅनमध्ये रुपांतरित केले आहे. किचन वर्कटॉप तयार करण्यासाठी एमिलिसने मोफत मिळणाऱया पॅलेट वुडचा वापर केला, ज्यावर तिने गुलाबी टाइल्स चिकटविल्या आहेत. याची किंमत 1400 रुपयांहून काहीशी अधिक आहे.
बिछान्यासाठी तिने ऍल्युमिनियम स्लेट्सचा वापर केला असून त्यावर लाकूड ठेवत स्वतःच्या झोपण्याची व्यवस्था केली. एअर व्हेंटिलेशनसाठी व्हॅनमध्ये तिने फॅन बसविला आहे. तर स्वतःचा शॉवर देखील तयार केला आहे. लोकांना तिचे हे घर खूपच आवडत आहेत.
एमिलिसने या पूर्ण उपक्रमणत सुमारे 5 हजार युरो म्हणजेच 5 लाख रुपये जुनी व्हॅन खरेदी करण्यात खर्च केले. तर 2 हजार युरो याच्या इंटीरियरकरता खर्च केले आहेत.