Tarun Bharat

भंडारी समाजाच्या युवा समितीचे कार्य कौतुकास्पद

जयेश साळगावकर यांचे उद्गार, पेडणे येथे वनमहोत्सव कार्यक्रम

प्रतिनिधी / पेडणे

पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी गोमंतक भंडारी युवा समितीने वनमहोत्साच्या माध्यमातून हाती घेतलेला उपक्रम झाडे लावणे आणि झाडे वितरीत करणे हे भंडारी समाजाच्या युवा समितीचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन माजी मंञी तथा साळगाव मतदारसंघाचे आमदार जयेश साळगावकर यांनी पेडणे येथे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना केले.

    गोमंतक भंडारी समाजाच्या अखिल गोवा युवा भंडारी समितीच्या वतीने आयोजित केलेल्या पेडणे तालुका वनमहोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने आमदार जयेश साळगावकर बोलत होते.  पालिका  क्षेत्रात नानेरवाडा पेडणे येथे रुदेश नागवेकर यांच्या निवासस्थानी वनमहोत्सव कार्यक्रम झाला.

 यावेळी व्यासपीठावर  आखिल गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष आशोक नाईक , खास निमंञीत पाहुणे म्हणून थिवी मतदारसंघाचे माजी आमदार किरण कांदोळकर, पेडणे नगराध्यक्षा श्वेता कांबळी, उपाध्यक्ष देवानंद नाईक , खजिनदार जगुसो नाईक, युवा अध्यक्ष सुप्राज तारी, नगरसेविका उषा नागवेकर, नगरसेवक प्रशांत गडेकर, नगरसेवक दीपक मांदेकर  , युवा सरचिटणीस मशाल आडपईकर , माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर ,उद्योजक दत्तप्रसाद नाईक, सल्लागार   सिध्देश नाईक,  निमंञक समिर मांदेकर, उपाध्यक्ष गुणाजी मांदेकर,  सचिव दिशक नाईक  आदी उपस्थित होते.

ड़ समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य करावेः आशोक नाईक

गोमंतक भंडारी समाज अध्यक्ष अशोक नाईक म्हणाले , गोमंतक भंडारी समाज हा गोव्यात सर्वात मोठय़ा  संख्येने असलेला समाज आहे.  माञ विविध  क्षेत्रात या समाजावर अन्याय होत आहे. समाजात मतभेद न करता सर्वांनी  एकसंघ होऊन विविध उपक्रम आणि कार्यक्रम हाती घेतल्याने  समाज बांधवाची ओळख होते.  युवा समितीतर्फे बाराही तालुक्मयात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

माजी आमदार किरण कांदोळकर, युवा अध्यक्ष सुप्राज तारी नाईक यांचीही भाषणे झाली.

  यावेळी   कृष्णा पालयेकर,  रामा शिरोडकर, प्रशांत नागवेकर, गवेकर , राजेश आरोलकर,  नितिन शोरोडकर , रिमा आसोलकर, वासुदेव नागवेकर, नारायण आसोलकर,  तुळशीदास  कवठणकर मोहन तळवणेकर, किशोर किळेकर ,हरिश्चंद्र आसोलकर,  सुधार आसोलकर ,निधी काजळे आदी समाज बांधव तसेच नगराध्यक्षा ,  नगरसेवक यांना पाहुण्याच्या हस्ते झाडे वितरीत केली. व मान्यवराच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले.

स्वागत व प्रास्तविक सुप्राज तारी यांनी केले. सूञसंचालन मशाल आडपईकर यांनी केले तर आभार उषा नागवेकर यांनी मानले.

Related Stories

राज्यात आजपासून दिवाळी उत्सवाला प्रारंभ

Amit Kulkarni

सावर्डे येथे गव्यारेडय़ाला विहीरीतून सुखरूप जीवदान

Patil_p

जोरदार वादळी वाऱयाने दाणादाण

Patil_p

फर्मागुडीत लवकरच सौर उर्जा वीज प्रकल्प

Amit Kulkarni

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविणार

Amit Kulkarni

म्हादईचे पाणी गोवा सरकारच्या संमतीनेच वळविले

Patil_p