Tarun Bharat

भंडाऱयाच्या उधळणीत पिरनवाडी, खादरवाडीत मिरवणूक

Advertisements

मजगाव येथील महालक्ष्मी देवी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

वार्ताहर / किणये

पारंपरिक वाद्याचा गजर आणि भंडाऱयाच्या उधळणीत पिरनवाडी, खादरवाडी गावातील महालक्ष्मीदेवीची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक वाजत गाजत मजगाव येथील लक्ष्मी मंदिराजवळ आली. आणि सामूहिक पद्धतीने देवीची ओटी भरण्यात आली. गुरुवारी मजगाव येथील या यात्रेची भक्तिमय व उत्साही वातावरणात सांगता झाली.

गेल्या पाच सहा दिवसापासून मजगावात यात्रोत्सव सुरू असून गुरुवारी पिरनवाडी, खादरवाडी व हुंचेनट्टी गावातील भाविकांच्यावतीने ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे यात्रा साध्या पद्धतीने झाली. गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मंदिर परिसरात विविध प्रकारची खेळणी व इतर स्टॉल्स लावण्यात आले होते.

पिरनवाडी गावच्या वतीने देवीसाठी दोन हार करण्यात आले. याची मिरवणूक काढून ग्रामस्थांच्यावतीने देवीला हार अर्पण करण्यात आला. गुरुवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान या यात्रोत्सवाची सांगता झाली.

Related Stories

एटीएसमधील आणखी दोन जवानांना कोरोना

Patil_p

ई-छावणीद्वारे कर भरणाऱयांना मिळणार पाच टक्के सवलत

Amit Kulkarni

जांबोटीनजीक इनोव्हा-बोलेरो अपघात

tarunbharat

आणखी पाच जणांचा अहवाल निगेटिव्ह

tarunbharat

गुरुंच्या जन्मशताब्दी लाभला पुरस्कार सर्वोच्च

Patil_p

चौथे रेल्वेगेट येथे अडकताहेत वाहने

Amit Kulkarni
error: Content is protected !!