Tarun Bharat

भगतसिंह कोश्यारी यांनी स्वीकारली गोव्याच्या राज्यपालपदाची सूत्रे

ऑनलाईन टीम / पणजी : 

गोव्याचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली आहे. त्यांनी आज सकाळीच गोव्याचा निरोप घेतला. त्यांच्या जागी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गोव्याच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.

आज सायंकाळी गोव्याच्या दोनपावल येथील राजभवनात कोश्यारी यांनी एका छोटे खाणी कार्यक्रमात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. कोंकणीतून शपथ घेणारे कोश्यारी हे गोव्यातील पहिले राज्यपाल आहेत. आता गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या राज्यपालपदी भगतसिंह कोश्यारी असणार आहेत. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर सत्यपाल मलिक यांची बदली मेघालयच्या राज्यपालपदी करण्यात आली आहे. सप्टेंबर 2019 रोजी भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली होती.

Related Stories

ईडीची माजी मंत्री रोशन बेग यांच्या बेंगळूर येधील घरावर छापेमारी

Archana Banage

पाकचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये ठार

datta jadhav

डॉ. दत्तगुरु आमोणकर यांची इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या क्षेत्रिय संचालकपदी नियुक्ती

Amit Kulkarni

धक्कादायक : 2020 मध्ये भारतात दिवसाला 80 हत्या आणि 77 बलात्कार

Archana Banage

पालिकेत बिलाचा गडबड घोटाळा

Patil_p

दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीचा खून

Amit Kulkarni